Nora Fatehi Hot Dance: नोरा फतेही चा हा हॉट डान्स पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम, Watch Video
Nora Fatehi (Photo Credits: Instagram)

आपल्या हटके डान्स स्टाईल आणि सेक्सी लूकमुळे भल्याभल्यांची झोप उडविणारी नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या बरीच चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये दिलबर (Dilbar), हाय गरमी (Garmi), ओ साकी (O Saki) यांसारख्या जबरदस्त गाण्यांवरील तिच्या अफलातून डान्समुळे अनेकांना तिची भुरळ पडली. लॉकडाऊनमध्ये ही नोरा फतेही आपल्या फिटनेसवर आणि डान्सवर अगदी बारीक लक्ष देत आहे. डान्सची आवड असलेली नोरा आपल्या हटके डान्स स्टेप्सने लॉकडाऊनमध्येही आपल्या चाहत्यांना खूश करत आहे. नुकताच तिने आपला एक हॉट डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत नोरा आपल्या डान्स पार्टनरसह एका इंग्लिश गाण्यावर डान्स करत आहे. यात तिच्या हटके डान्स स्टाईल पाहून तुम्हालाही थिरकावेसे वाटेल. हा व्हिडिओ आतापर्यंत 21 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

Nora Fatehi च्या 'या' सेक्सी डान्स मूव्हसची चाहत्यांना पडली भुरळ, 8 लाखांहून अधिक लोकांनी केले पसंत, Watch Video

सत्यमेव जयते या चित्रपटातील 'दिलबर' गाण्यामुळे नोरा घराघरात पोहोचली. नोराने डान्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नोरा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनेक डान्स व्हिडीओ शेअर करत असते. नोराचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सर 3D मधील तिचे गरमी गाणे सुद्धा प्रचंड लोकप्रिय झाले आहे. या गाण्यात नोरा फतेही चा बोल्ड आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळाला. तसेच तिचा बूटी डान्सची झलक देखील पाहायला मिळाली.