Kapil Sharma याला झालंय तरी काय? व्हीलचेअरमध्ये बसून विमानतळावरुन बाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद; चाहत्यांनाही बसला धक्का (पाहा Video)
Kapil Sharma

विनोदी कलाकार कपिल शर्मा (Kapil Sharma) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kapil Sharma Viral Video) झाला आहे. या व्हिडिओत कपील शर्मा हा व्हिलचेअरवर बसून विमानतळावरुन बाहेर पडताना दिसत आहे. व्हिलचेअरवरुन बाहेर पडताना कपील शर्मा काहीसा गंभीरही दिसतो आहे. त्याने डोळ्याला गॉगल आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे. परंतू, तहीही तो गंभीर असल्याचे जाणवते. कॅमेऱ्यासमोर बोलायला त्याने नकार दिला. त्यामुळे कपील शर्मा याला नेमकं झालंय तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कपील शर्मा याला व्हिलचेअरवर (Kapil Sharma On Wheelchair ) पाहून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

कपील शर्मा व्हिलचेअरवरुन जाताना कॅमेऱ्यात दिसतो आहे. कॅमेऱ्यासमोर त्याला विचारण्यात येते आहे की, नेमके काय झाले आहे. परंतू, कपील काहीच बोलत नाही. तो व्हिलचेअरवर बसून सरळ पार्किंग एरियामध्ये जातो. तिथेही मीडिया त्याच्या पाठी धावतो परंतू काहीही उत्तर न देता तो पुढे निघून जातो. व्हायरल झालेल्या या व्हिडिओवरही कपीलने काहीही टिप्पणी केली नाही. त्यामुळ त्याचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत की, कपीलला झालंय तरी काय? (हेही वाचा, कॉमेडियन Kapil Sharma ने पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; पत्नी Ginni Chatrath ने दिला गोंडस मुलाला जन्म)

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

कपील शर्मा हा एक उत्तम विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. नुकताच तो दुसऱ्यांदा बाबा झाला. त्याची पत्नी गिन्नी चतरथ हिने एका बाळाला जन्म दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कपील शर्मा विनोदी कार्यक्रम आणि एकूणच व्यावसायिक करीअरपासून काहीसा दूर असल्याचे सांगितले जात आहे. यााबत कपील शर्मा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले होते की, माझी पत्नी लवकरच आई बनणार आहे. त्यामुळे काही काळ मी ब्रेक घेणार आहे. दरम्यान कपील नेटफ्लिक्सवर एका वेबसिरीजच्या माध्यनीतून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे.