कॉमेडियन Kapil Sharma ने पुन्हा एकदा दिली गुड न्यूज; पत्नी Ginni Chatrath ने दिला गोंडस मुलाला जन्म
Ginni Chatrath and Kapil Sharma (Photo Credits: Instagram)

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा बाबा झाला आहे. आज म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी त्याच्या घरात गोंडस मुलाने जन्म घेतला आहे. कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथ (Ginni Chatrath) यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. कपिलने ही गुड न्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसाठी शेअर केली आहे. कपिल शर्माने ट्विटमध्ये आई आणि मुलगा दोघेही निरोगी असल्याचं सांगितलं आहे. कपिल शर्माने सकाळी साडेपाच वाजता ट्विट करत सांगितलं आहे की, नमस्कार, आज सकाळी आम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रुपात मुलगा झाला. ईश्वराच्या कृपेने बाळ आणि आई दोघंही चांगले आहेत. तुमचं प्रेम आणि प्रार्थनांसाठी आभार. गिन्नी आणि कपिल.

कपिल शर्मा यांनी ट्विट करताच चाहत्यांनी त्याच अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. कपिलचे सर्व चाहते त्याच्या मुलाचा पहिला फोटो आणि नाव जाणून घेण्यास उत्सुक आहेत. कपिल आणि गिन्नी यांनी घरी नवा पाहुणी येणार असल्याची बातमी गुपीत ठेवली होती. त्यामुळे कपिलच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये, बेबी बंपसह गिन्नीचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला होता. ज्यामुळे कपिलच्या दुसर्‍या मुलाची बातमी पसरली होती. परंतु, कपिलने यासंदर्भात काहीही अधिकृतरित्या सांगितलं नव्हतं. (वाचा - Riteish Deshmukh आणि Genelia ची त्यांच्या मित्रांसोबतची 'ही' धमालमस्ती पाहून तुम्हीही लोटपोट होऊन जाल, Watch Video)

दरम्यान, 10 डिसेंबर रोजी कपिल शर्माची मुलगी अनाराया एक वर्षाची झाली. कपिल आणि गिन्नी यांचे डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर गिन्नी गरोदर असल्याची बातमी जुलैमध्ये उघडकीस आली होती. त्यानंतर कपिलने याची पुष्टी केली होती.