Riteish Deshmukh आणि Genelia ची त्यांच्या मित्रांसोबतची 'ही' धमालमस्ती पाहून तुम्हीही लोटपोट होऊन जाल, Watch Video
Riteish Deshmukh-Genelia Deshmukh (Photo Credits: Instagram)

रितेश देशमुख (Ritiesh Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा देशमुख (Genelia D'Souza Deshmukh) यांचे सोशल मिडियावर देखील असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असतात. रितेश आणि जेनेलिया ही बॉलिवूडमधील एक क्युट जोडी असल्याचे नेहमीच आपण ऐकत आलो आहोत. ते अनेकदा आपल्या कुटूंबासोबतचे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असतात. मात्र आता त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत केलेली धमालमस्ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. हे व्हिडिओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रितेशने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत 'हालालूया' या इंग्रजी गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात अभिनेता आशिष चौधरी, शब्बी अहलूवालिया त्याची पत्नी कांची कौलसह अन्य मित्र मैत्रिणीदेखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

तर जेनेलिया देशमुखने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रितेश, शब्बीर आणि आशिष मिथुन चक्रवर्तीच्या 'अटरिया मे लोटन कबूतर' या गाण्याची चाल बदलून एका अंतरंगी अंदाजात गाताना दिसत आहे.हेदेखील वाचा- रितेश देशमुख ने लग्नापूर्वी जेनेलिया ला पाठवलेल्या 'त्या' मेसेजमुळे त्यांचे नाते येणार होते संपुष्टात, कपिल शर्माच्या शो मध्ये पत्नीने सांगितला किस्सा

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

रितेश आणि जेनेलिया सोशल मिडियावर बरेच सक्रिय असतात. लॉकडाऊनच्या काळातही या दोघांची आपल्या चाहत्यांची प्रचंड मनोरंजन केले होते. त्यांचे व्हिडिओज आणि फोटोज सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असतात.