Genelia D'souza and Riteish Deshmukh (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडमधील क्युट जोडप्यांमधील एक प्रतिष्ठित जोडपे म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख (Riteish And Genelia Deshmukh). आपल्या चित्रपटातून झालेली ओळख, त्यातून झालेली मैत्री आणि नंतर आयुष्यभरासाठी एकमेकांशी लग्नगाठीत जोडले हे गेलेले हे क्युट कपल. याचे अनेक मजेशीर व्हिडिओ आपल्याला सोशल मिडियावर पाहायला मिळतात. लग्नानंतर आपल्या मुलांसह आणि कुटूंबास आपले आयुष्य छान एन्जॉय करताना रितेश-जेनेलिया नेहमी दिसतात. या जोडप्याचे आदर्श जोडपे म्हणून अनेकदा उदाहरण दिले जाते. मात्र यांच्यातील हे गोड नाते रितेशच्या एका चुकीच्या मेसेजमुळे लग्नापूर्वीच संपुष्टात येणार होते. याबाबत एक धक्कादायक किस्सा त्याची पत्नी जेनेलिया ने कपिल शर्माच्या शो मध्ये सांगितला.

झाले असे की, रितेश 1 एप्रिलच्या बहाण्याने जेनेलियाला आपले नाते इथेच थांबवूया असा सांगणारा मेसेज पाठवला. हा मेसेज त्याने पहाटे 4 वाजता पाठवला होता. मात्र शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे जेनेलियाने हा मेसेज 7 वाजता पाहिला आणि तो पाहून तिला धक्काच बसला. तिने तात्काळ आपला फोन स्विच्ड ऑफ देखील करुन टाकला. मात्र रितेशच्या हे लक्षात आले नाही. तो सकाळी उठला आणि घडले ते ऐका जेनेलियाच्या तोंडून....

हेदेखील वाचा- रितेश देशमुख आणि जेनेलिया च्या प्रेमाला लॉकडाऊन काळात आला बहर, संजय दत्त च्या लोकप्रिय गाण्यावर बनवला TikTok व्हिडिओ

त्याने जेनेलियाला कॉल करुन सांगितले की काय झाले. त्यावर तिने त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यावर तो म्हणाला अरे मी एप्रिल फुल करत होतो. त्यावर जेनेलिया अचंबित झाली. थोडक्यात रितेशने केलेले Prank हे त्यांचे नाते संपुष्टात आणण्यासाठी कारणीभूत ठरणार होते. मात्र रितेश अगदी थोडक्यात वाचला. नाहीतर त्याची ही मस्करी त्याच्या चांगलीच अंगलट येणार होती.

रितेश आण जेनेलियाने 2003 साली 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर रितेश-जेनेलिया यांचा विवाह 2012 साली झाला. त्यांचा लग्नाला 8 वर्ष झाली असून त्यांना रियान आणि राहिल ही दोन मुले आहेत.