कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रंगणार रमा माधवाचा विवाहसोहळा
स्वामिनी मालिका

कलर्स मराठीवर काही दिवसांपूर्वीच सुरु झालेली मालिका 'स्वामिनी' (Swamini) ही सर्व प्रेक्षक आवर्जून पाहतात. तर या मालिकेत रमा माधव यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाहसोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून प्रेक्षकांना रात्री 8.30 वाजता हा विवाहसोहळा पाहता येणार आहे. अखेर तो क्षण आला, सगळ्या अडचणींना, परीक्षांना पार करून आता शिवाजी जोशी यांची कन्या म्हणजेच रमाची लग्नगाठ पेशवे माधवराव यांच्याशी बांधली जाणार आहे. निवारवाडा अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी ठरला, अनेक सोहळे त्याने पाहिले, पेशव्यांच्या सुखात सहभागी झाला आणि दु:खात खंबीरपणे तठस्थ उभा राहिला हाच शनिवारवाडा साक्षी होता एका विलक्षण प्रेमकहाणीचा. हिच प्रेमकहाणी आता लग्नाच्या बेड्यात अडकणार आहे. या वाड्यात लहानगी रमा लग्न होऊन आली आणि संपूर्ण पेशवाईला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे.

रमा माधवच्या लग्नसोहळ्या बद्दल आपण बरेच ऐकून आहोत पण, आता तो प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे.पेशवाई थाटमाट, सनई चौघडे, रोषणाई यामध्ये रमा आणि माधव लग्न बंधनामध्ये बांधले जाणार आहेत. रमा एका सामान्य घरात वाढलेली निरागस मुलगी जिच्या नशिबी पेशवीणबाई होण्याचे थोर भाग्य आले आता ती भावी काळात येणार्‍या जबाबदार्‍या कशी पार पडेल ? माधवराव आईच्या विरोधात जाऊन तिला कशी साथ देतील? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. रमा - माधव यांची नावे सुवर्णाक्षरांनी इतिहासाच्या पानावर कोरली गेली. माधवरावांचे रमावर असलेले अपार प्रेम, रमाबाईंनी केलेला त्याग याला पेशवाई साक्ष आहे. हे सगळे कसे घडले ? रमा – माधव यांचा हा प्रवास कसा होता ? त्यांना कोणाची साथ लाभली? गृह कलह, घरातील राजकारण हे होत असतानाच रमाने पेशवाईचा भार कसा सांभाळला याचा प्रवास आता प्रेक्षकांना मालिकांच्या पुढील भागात पहायला मिळणार आहे.(Ti And Ti : दारू पिऊन आलेल्या नवऱ्याची भूमिका करण्यासाठी Pushkar Jog खरोखरच प्यायला होता दारू, Prarthana Behere ने शेअर केला एक खास किस्सा)

रमा यांची मुख्य भुमिका साकारणी बालकलाकार सृष्टी पगारे ही कलर्स मराठीवरील 'सुर नवा ध्यास नवा' या सांगतीक रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. एका मुलाखतीदरम्यान सृष्टी हिने रमा यांची भुमिका साकारण्यासाठी अनेक ऐतिहासिक साहित्यसह चित्रपट पाहिले असल्याचे सांगितले. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मुख्य गोपिका बाईच्या भुमिकेत आहे. तसेच माधव यांची भुमिका चिन्मय पटवर्धन साकारत आहे.