Ti And Ti : दारू पिऊन आलेल्या नवऱ्याची भूमिका करण्यासाठी Pushkar Jog खरोखरच प्यायला होता दारू, Prarthana Behere ने शेअर केला एक खास किस्सा
Ti And Ti Poster (Photo Credits: File Image)

'ती अँड ती' या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर लवकरच Zee Talkies या वाहिनीवर प्रदर्शित होणार असून या सिनेमाचं बहुतांश शूटिंग हे लंडनमध्ये करण्यात आलं आहे. सिनेमात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

पाहूया प्रार्थना बेहरे काय सांगत आहे 'ती अँड ती' सिनेमाबद्दल...

चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?

'ऍरेंज मॅरेज'मधून आपल्याला हवा तसा जोडीदार मिळाला आहे, असं मानणाऱ्या एका अल्लड मुलीची भूमिका मी या चित्रीपटात साकारली आहे. तिचा तिच्या नवऱ्यावर खूप विश्वास आहे. हनीमूननंतर सुद्धा नवरा-बायकोच्या प्रेमळ नात्यात हवी तेवढी जवळीक निर्माण झालेली नसली, तरीही तिचा तिच्या प्रेमावर विश्वास आहे. आपला नवरासुद्धा या नात्यात पुरेसा गुंतला गेला आहे अशी तिची समाज असते आणि त्याचसोबत तिच्या नकळत घडणाऱ्या इतर गोष्टींविषयी ती अनभिज्ञ असते.

Girlz Official Teaser: बॉइज ना चॅलेंज देईल 'गर्ल्स' चित्रपटाचा हा धमाकेदार टीझर

सोनाली आणि पुष्करसोबत काम करत असतानाचा अनुभव कसा होता?

सोनाली आणि मी आधीपासूनच छान मैत्रिणी आहोत. त्यामुळे काम करणं सोपं गेलं. शूटिंगसोबत आमी खूप मजा देखील केली. मृणाल कुलकर्णी या अभिनेत्रीसोबतच एक उत्तम दिग्दर्शिकासुद्धा आहेत. पुष्करसारख्या कलाकारासोबत काम करणं ही देखील आनंदाची बाब होती.

लंडनमध्ये शूट करण्याच्या अनुभवाविषयी आम्हाला काय सांगशील?

लंडनमधल्या वातावरणाचा अंदाज कधीच बांधता येत नाही. त्यामुळे तिथे शूट करणं, हे आव्हानात्मक होतंच. पण सोनाली, पुष्कर आणि मृणाल असल्यामुळे चित्रीकरणादरम्यान येणारं आव्हान सहज पेलता आलं.

चित्रपटाच्या शूट दरम्यानचा एखादा मजेशीर किस्सा सांगशील का?

रात्रभर घराबाहेर असलेला नवरा, खूप दारू पिऊन घरी परत येतो, असा एक प्रसंग शूट करायचा होता. ते रिअल वाटावं म्हणून पुष्करने खरोखरच थोडी दारू प्यायची ठरवली होती. आणि माझे क्लोज शॉट्स घ्यायची वेळ आली, तोवर मात्र पुष्करला नशेमुळे झोप येऊ लागली. जवळपास २१ तास आम्हाला हा प्रसंग चित्रित करण्यासाठी घालवावे लागले.