Girlz Official Teaser: बॉईज ना चॅलेंज देईल 'गर्ल्स' चित्रपटाचा हा धमाकेदार टीझर
Girlz Teaser (Photo Credits: YouTube)

स्वत:ला डॅशिंग समजणाऱ्या सध्याच्या तरुणांना चॅलेंज देण्यासाठी एक आगळावेगळा चित्रपट 'गर्ल्स' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डबल मिनिंग आणि सध्याच्या भाषेतील नॉनव्हेज मिनिंग असलेला गर्ल्स चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ह्या टीजर मध्ये मुलांप्रमाणे मुली आयुष्यात सर्व मजा करु शकतात इतकच काय तर मुलांना आपल्या तालावर नाचवू शकतात असा आशय दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात ज्या 3 मुली दाखविण्यात आल्या आहेत त्या तिघीही नवे चेहरे असून या चित्रपटातून पदार्पण करत आहेत.

'बॉईज' (Boyz) आणि 'बॉईज 2' (Boyz 2) सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा गर्ल्स हा चित्रपट येत्या 29 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुली काहीच करु शकत नाही असं म्हणणाऱ्यांना या टीझरमधून चपखल उत्तर देण्यात आल्याचं दिसून येत आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमधून या मुली मनमुरादपणे जगताना, राडा घालताना, पबमध्ये धमाल-मस्ती करताना दिसत आहेत. एकंदरीतच त्या खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

करणे एकंदरच लाईफ एन्जॉय करताना त्या दिसत आहेत.

हेदेखील वाचा- 'आयुष्यावर बोलू काही...' कार्यक्रमाचा अपमान असल्याचंं सांगत Girlz Poster चा संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्याकडून निषेध

मुलींची धमाल, त्यांचे गॉसिपिंगचे विषय,त्यांची जगण्याची संकल्पना अशा मुलींशी संबंधित बऱ्याच गोष्टी या अनेकदा त्यांच्यापुरताच मर्यादित असतात. त्याची कल्पना इतरांना नसते. त्यामुळे मुली लाईफ एन्जॉय करतच नाहीत, असा अनेकांचा समज असतो. हाच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.

या भन्नाट चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून नरेन कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या टीजरमधील 'आईच्या गावात आणि बाराच्या भावात' हे गाणे देखील सध्याच्या तरुण पिढीला नक्की आवडेल असं दिसतेय. मात्र या नवीन स्टारकास्टला प्रेक्षक किती पसंत करतात तसेच हा विषय सगळ्यांना कितपत रुचतो हे येत्या 29 नोव्हेंबरला कळेलच.