कलर्स मराठीच्या (Colors Marathi) प्रेक्षकांना गेल्या कित्येक दिवसांपासून सर्वांना उत्सुकता लागलेला 'कलर्स मराठी अॅवॉर्ड 2020' (Colors Marathi Awards 2020) सोहळा आज संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या पुरस्कार सोहळ्याचे प्रोमोज आपल्याला कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळत होते. मात्र आज संध्याकाळी 7 वाजता हा पुरस्कार सोहळा कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. हा पुरस्कार सोहळा सुरु होण्याआधी संध्याकाळी 6.30 वाजता या सोहळ्याचे पूर्वरंग पाहायला मिळणार आहे. या सोहळ्याचे फोटोज सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कलर्स मराठी पुरस्कार सोहळा 2020 मध्ये कोण सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट कुटूंब ठरणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या सोहळ्यात तुम्हाला तुमच्या आवडत्या जोडीचे जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत.हेदेखील वाचा- 'जीव झाला येडापिसा' या मालिकेमधील शिवा-सिद्धी या जोडीने केले 10 तास पाण्याखाली शूट, अंगावर काटा आणणारा हा एपिसोड आज होणार प्रदर्शित, Watch Video
View this post on Instagram
यात शिवा-सिद्धी, अभि-लती, रणजीत-संजू या जोड्या आपला रोमांटिक अंदाज डान्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.
View this post on Instagram
त्याचबरोबर कलर्स मराठी वाहिनीवर खलनायिकेच्या भूमिकेत असलेले कलाकारांचाही विशेष परफॉर्मन्स सादर होणार आहे.
View this post on Instagram
या पुरस्कार सोहळ्यामध्ये राजा-राणीची जोडी, जीव झाला येडापिसा, बाळूमामा, शुभमंगल ऑनलाईन, सुंदरा मनामधी भरली सारख्या अनेक मालिकांना वेगवेगळ्या विभागात नामांकने मिळाली आहेत. त्यामुळे या मालिकांच्या चाहत्यांना आपली आवडती मालिका पुरस्कार पटकावते की नाही हे पाहण्यासाठी आज संध्याकाळी हा पुरस्कार सोहळाच पाहावा लागेल.