बिग बॉस- 13 सीजनसाठी तयारी सुरु, यंदा नव्या ठिकाणी शूट होणार शो
Bigg Boss (Photo Credits-Twitter)

टेलिव्हिजनवरील सर्वात विवादित रिअॅलिटी शो बिग बॉस (Big Boss) पुन्हा एकदा त्यांचा नवी सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. तसेच या शोसाठीचे शूटिंग नेहमी थंड हवेच्या ठिकाणी केले जाते. त्यामुळे खासकरुन बिग बॉसच्या या पूर्वीच्या सीजनचे शूटिंग लोणावळ्यात झाले आहे. तर फक्त पाचवा सीजनचे ऑनएअर शूट कर्जत येथून झाले.त्याचसोबत शेवटचा सीजन गोवा येथे रंगला होता.

बिग बॉस-13 चा सीजन सुरु होण्यापूर्वी तयारी सुरु करण्यात आली आहे. परंतु अद्याप निर्मात्यांकडून या शोसाठी ठिकाण नक्की करण्यात आलेले नाही. तर दिग्दर्शक उमंग कुमार यांच्या मते शोसाठी नव्या ठिकाणाचा शोध घेण्यात येत आहे. एका मुलाखती दरम्यान उमंग कुमार यांनी असे म्हटले आहे की, सध्या मराठी बिग बॉस करत असून त्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच शो खुपच धमाकेदार असणार आहे.(हेही वाचा-Bigg Boss Marathi 2 Contestants: 'बिग बॉस'ने केला रसिकांचा एप्रिल फूल; स्पर्धकांची नावं अद्याप गुलदस्त्यात)

उमंग कुमार यांची पत्नी विनीता कुमार बिग बॉसच्या घराचे डिझाईन करणार आहे. विनीता कुमार ह्या गेल्या 7 वर्षांपासून बिग बॉस शोसोबत काम करत असून सध्याच्या येणाऱ्या सीजनसाठी अद्याप कोणतीही थीम ठरवण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.