Bigg Boss Marathi Season 3 Teaser: बिग बॉस मराठी सीझन 3 ची घोषणा; इथे पहा पहिली झलक (Watch Video)
Bigg Boss 3 | Photo Credits: Instagram / Colors Marathi

हिंदी टेलिव्हिजन सोबतच प्रादेशिक भाषांमध्येही रिअ‍ॅलिटी शो मध्ये आपली हुकूमत गाजवणारा शो म्हणजे 'बिग बॉस'(Bigg Boss). मराठी मध्ये पहिल्या 2 सीझनला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तिसर्‍या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. नुकताच मराठी बिग बॉस सीझन 3 चा पहिला टीझर (Bigg Boss Marathi Season 3 Teaser) प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठी चॅनलच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याची पहिली प्रदर्शित झाली आहे त्यामुळे आता तिसर्‍या सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी असतील, यंदाची थीम काय असेल अशा अनेक प्रश्नांबाबत रसिकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान पहिल्या टीझरमध्ये केवळ तिसर्‍या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. हळूहळू या शो बाबतचे अपडेट्स दिले जाणार आहेत. 'पुन्हा होणार कल्ला, पुन्हा होणार राडे आणि सदस्यांसोबत रंगणार खेळ दर्जेदार, कारण पुन्हा दिमाखात उघडणार बिगबॉसच्या घराचं दार' अशा कॅप्शन सह हा टीझर प्रदर्शित झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी सलमान खानने हिंदी बिग बॉसच्या नव्या सीझनची देखील घोषणा केली आहे. पहा त्याचा देखील प्रोमो !

बिग बॉस मराठी सीझन 3 पहिली झलक

एप्रिल- मे महिन्यातच बिग बॉस सीझन 3 येणार अशी चर्चा होती मात्र कोरोना व्हायरसमुळे हा शो पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान आता येत्या एक ते दीड महिन्यात पुन्हा हा शो रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.

महेश मांजरेकर यांनी पहिल्या दोन सीझनचं अ‍ॅंकरिंग केले आहे. तर पहिल्या सीझनची विजेती मेघा घाडे होती तर दुसर्‍या सीझन मध्ये शिव ठाकरेने बिग बॉसचं विजेतेपद पटकावलं होतं.