Bigg Boss 14 New Promo: बिग बॉस 14 च्या प्रोमो मधून सलमान खान ने 2020 मनोरंजनाचा सीन पलटण्याचा केला दावा, Watch Video
Bigg Boss Promo (Photo Credits: Instagram)

ब-याचदा वादाच्या भोव-यात अडकलेला छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शो 'बिग बॉस चा सीजन 14' (Bigg Boss 14) लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा एक नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे. '2020 मध्ये मनोरंजनाचा सीन पलटणार' असं सलमान खान (Salman Khan) या प्रोमो मध्ये सांगत आहे. या प्रोमो मध्ये दबंग सलमान खानचा अंदाजही काही औरच आहे. या कार्यक्रमाच्या नव्या प्रोमो मध्ये सलमान एका थिएटरमध्ये पॉपकॉर्न खाताना दिसत आहे. त्यानंतर त्याने एक भन्नाट वाक्य कॅमे-यासमोर म्हटले आहे.

'2020 ने उठाया प्रश्न, देंगे उत्तर मानते हुए जश्न, अब सीन पलटेगा. क्योंकि बिग बॉस देंगे 2020 को जवाब' असं या प्रोमोमध्ये सलमान खान म्हणत आहे. Bigg Boss 14: सप्टेंबरपासून सुरु होणार सलमान खानच्या ‘बिग बॉस’चा 14 वा सिझन; निया शर्मा, व्हिव्हियन डीसेना, अध्यायन सुमन होऊ शकतात यंदाच्या पर्वाचा हिस्सा

पाहा हटके प्रोमो:

तसं पाहायला गेलं तर या प्रोमोमधून काही विशेष हिंट मिळाली नाही. मात्र कोरोना व्हायरस दरम्यान बिग बॉसच्या घरात काय नवीन बदल पाहायला मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma), व्हिव्हियन डीसेना (Vivian Dsena) आणि शेखर सुमन (Adhyayan Suman) यांचा मुलगा अध्यायन सुमन यंदाच्या पर्वामध्ये दिसू शकतात. ईटाइम्सच्या अहवालानुसार सुष्मिता सेनचा भाऊ अभिनेता राजीव सेन याच्याशी देखील या बिग बॉस सीजन 14 साठी संपर्क साधण्यात आला आहे. राजीव आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. याशिवाय शुभांगी अत्रे, सुरभी जोशी असे कलाकारही यंदाच्या सिझनचा हिस्सा होऊ शकतात.