Bigg Boss Marathi 4 (संग्रहित संपादित प्रतिमा)

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून बिग बॉसकडे (Bigg Boss) पाहिले जाते. हिंदीमध्ये हा शो लोकप्रिय ठरल्यानंतर काही वर्षांपूर्वी मराठीमध्ये हा शो सुरु झाला व आजपासून मराठी बिग बॉसचे चौथे पर्व (Bigg Boss Marathi 4) सुरु होणार आहे. आज म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमाचा प्रीमियर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर या शोचे सुत्रसंचलन करताना दिसणार आहेत. यंदाच्या पर्वाची थीम ‘ऑल इज वेल’ ठरण्यात आली आहे.

यंदाच्या मराठी बिग बॉसच्या पर्वात नेमके कोण सेलेब्ज दिसणार आहेत याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. प्रेक्षकांमध्ये असलेली याबाबतची उत्सुकता आज संध्याकाळी शमणार आहे. परंतु सोशल मीडियावर यंदाच्या पर्वात अपूर्वा नेमळेकर, नेहा खान, समीर परांजपे, किरण माने, सायली संजीव, हार्दिक जोशी असे कलाकार दिसतील अशी चर्चा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठी 4 हा शो तुम्ही कलर्स मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10  वाजता, तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता पाहू शकता. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर वूट (Voot) वरही पाहता येणार आहे. जर तुम्ही व्होडाफोनचे युजर असाल, तर तुमचा व्होडाफोन मोबाईल क्रमांक वापरून तुम्ही Vi Movies and TV या App वरही शोचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल. (हेही वाचा: Raksha Bandhan OTT Release Date: अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' तारखेला होणार रिलीज)

वाद, भांडण, दंगा, प्रेम, आपुलकी, जवळीक असे स्वरूप असलेल्या या शोच्या थीमनुसार यंदाचे घर तयार करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही बिग बॉस मराठीचे घर खूप खास आणि आलिशान असणार आहे. दरम्यान, दुसरीकडे बिग बॉस 16 (हिंदी) ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. यामध्ये 15 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. यामध्ये बिग बॉस मराठी सीझन 2 चा विजेता ठरलेल्या शिव ठाकरे सुधा स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. सध्या सोशल मिडियावर शिवची जोरदार चर्चा आहे.