Raksha Bandhan OTT Release Date: अक्षय कुमारचा 'रक्षा बंधन' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'या' तारखेला होणार रिलीज
Raksha Bandhan Film Poster (PC - Twitter)

Raksha Bandhan OTT Release Date: अक्षय कुमार (Akshay Kumar) चा फॅमिली ड्रामा चित्रपट 'रक्षा बंधन' (Raksha Bandhan) 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय व्यतिरिक्त भूमी पेडणेकर देखील मुख्य भूमिकेत दिसली होती. बॉक्स ऑफिसवर त्याची थेट स्पर्धा आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाशी होती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.

अक्षय कुमारच्या ज्या चाहत्यांनी त्याचा 'रक्षाबंधन' चित्रपट चित्रपटगृहात पाहणे चुकवले, त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. लवकरच OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर 'रक्षा बंधन'चे स्ट्रीमिंग सुरू केले जाईल. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला रक्षाबंधन दसऱ्याच्यानिमित्ताने 5 ऑक्टोबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे. (हेही वाचा - Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास भेट, देशभरात चार दिवसीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन)

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म ZEE5 ने शनिवारी, 1 ऑक्टोबर रोजी त्याच्या ट्विटर हँडलवर घोषणा केली आणि लिहिले, "हशा, आनंद आणि भरपूर मजा करण्यासाठी सज्ज व्हा! कारण #रक्षाबंधन फक्त #ZEE5 वर येत आहे. यावर्षी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटांपैकी 'रक्षा बंधन' हा तिसरा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण 44.39 कोटींचा व्यवसाय केला. याने 8.20 कोटींची ओपनिंग घेतली होती. तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, येत्या काही दिवसातही हा चित्रपट काही विशेष करणार नाही.

अक्षय कुमार आणि भूमी व्यतिरिक्त, आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपटात अक्षयच्या चार बहिणींच्या भूमिकेत सादिया खतीब, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहजमीन कौर आहेत. सीमा पाहवा, नीरज सूद, अभिलाष थापलियाल आणि मनु ऋषी चढ्ढा हे देखील चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसले. यावर्षी, अक्षय कुमारचे चार चित्रपट सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षा बंधन आणि कटपुतली आले आहेत. अक्षय पुढे अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर ड्रामा राम सेतूमध्ये दिसणार आहे, जो दिवाळी सणाच्या एका दिवसानंतर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.