Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या घरात वीणा हिच्या आईने सदस्यांना भेट देत तिचे मत व्यक्त केल. मात्र शिवानी हिला वीणाच्या आईने एका टास्कदरम्यान लाथ मारल्याचे ऐकून दाखवले हे तिला पटले नाही. तसेच आरोहने बिचुकले यांना घरातील भांडी लावण्यास सांगितली त्यावरुन त्या दोघांमध्ये जोरदार वाद झाले. तसेच रुपाली हिचा भाऊ संकेत तिला भेटायला आल्याने तिला रडू आवरता आले नाही. मात्र बिचुकले यांचा राग अद्याप आवरता आल्याने शिवानी त्यांच्यावर रागावलेली दिसून आली.

दुसऱ्या दिवसाच्या सकाळी आरोह याची बायको अंकिता त्याला भेटायला आल्याने तो अत्यंत खुश झाला. अंकिता हिने किशोरी ताईंसह सर्व सदस्यांचे कौतुक केले. आरोह याने अंकितासह आई-बाबा यांच्यासाठी आपल्या भावना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केल्या. तसेच घरातील व्यक्तींच्या आठवणीत मी रोज रडतो असे सुद्धा आरोहने त्याच्या भावनात्मक शब्दांतून म्हटले. (Bigg Boss Marathi 2, Episode 69 Preview: अभिजित बिचुकले यांच्या परिवाराचे बिग बॉसच्या घरात आगमन, मातोश्री सदस्यांना देणार सल्ला)

त्यानंतर बिचुकले यांच्या मातोश्रींची बिग बॉसच्या घरातील एन्ट्री त्यांच्यासाठी खुप उत्सुकतेचे आणि भावना उफाळून येणार होते. आईला पाहताच बिचुकले यांनी प्रथम त्यांनी पायाला स्पर्श करत नमस्कार केला. त्यानंतर बिचुकले यांच्या आईने घरातील सर्व सदस्यांची भेट घेत  प्रत्येक सदस्याला सल्ला दिला. तसेच सर्व मुल मला आवडतात असे सुद्धा बिचुकले यांच्या आईने म्हटले. त्याचसोबत सर्व सदस्यांनी रिलिज झाल्यानंतर त्यांना नमस्कार करताना दिसले. येथे कोणाच्या चुका काढायच्या नाही त्या आपोआप सुधारतात असे सुद्धा त्यांनी म्हटले. मात्र शिवानीला बिचुकलेंच्या आईला पाहून अश्रू अनावर झाले. तसेच साध्या चपातीवरुन पुन्हा एकदा अभिजित आणि हिना मध्ये खटके उडताना दिसले.