Bigg Boss Marathi 2, Episode 69 Preview: अभिजित बिचुकले यांच्या परिवाराचे बिग बॉसच्या घरात आगमन, मातोश्री सदस्यांना देणार सल्ला
बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची त्यांच्या परिवारातील जवळच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार घरातील सदस्यांच्या परिवारातील कोण ना कोण तरी आल्याने त्यांच्या मनातील भावना उफाळून आलेल्या दिसून आल्या.
बिग बॉसच्या घरात सध्या सदस्यांची त्यांच्या परिवारातील जवळच्या व्यक्तीसोबत भेट घडवून आणण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार घरातील सदस्यांच्या परिवारातील कोण ना कोण तरी आल्याने त्यांच्या मनातील भावना उफाळून आलेल्या दिसून आल्या. तर काहींचे डोळे पाणावलेले दिसले. आजच्या एपिसोडमध्ये घरात पाहुणे म्हणून एन्ट्री झालेले अभिजित बिचुकले यांच्या परिवाराचे आगमन होणार आहे. तसेच बिचुकले यांच्या मातोश्री घरातील सदस्यांना काय सल्ला देणार हे पाहणे उत्सुकचे ठरणार आहे.
अभिजित बिचुकले यांनी जेव्हापासून बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होती त्यावेळ पासूनच त्यांना आपल्या दोन मुलांबद्दल फार कौतुक आहे. तसेच घरातील अन्य सदस्यांवरील प्रेमसुद्धा किती आहे हे त्यांच्याकडून व्यक्त झाल्याचे दिसून आले आहे. आज तर चक्क घरात साताऱ्याहून बिचुकले यांचा परिवार आणि आई आल्याने खुश झाल्याचे दिसले. तर आईची एन्ट्री होताच बिचुकले तिच्या पायाला हात लावत नमस्कार करतात. बिचुकले च्या मातोश्रींना घरातील सर्वच सदस्य आवडत असून त्यांना या स्पर्धेत उत्तम खेळण्यासह तुम्ही आता बिग बॉसची मुल आहात असे म्हणतात. तसेच त्यांच्या आईने दिलेला सल्ला किती जण पाळतात हे आता पाहायचे आहे.(Bigg Boss Marathi 2 Episode 68 Update: शिव- वीणा मध्ये येणार दुरावा? Statue टास्क मध्ये असं काय घडलं की ज्याने ढसाढसा रडली वीणा;जाणून घ्या)
अभिजीत बिचूकलेंच्या मोतोश्रींनी #BiggBossMarathi2 च्या घरातील सदस्यांना कोणता संदेश दिला?
पाहा #BiggBossMarathi2 रोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर. @abhijeetkellkar @officialveenie @ShivThakre @ArohWelankar @bhosle_rupali @GmKishori @imsurveshivani @TheHeenaPanchal pic.twitter.com/vTnnTipC7A
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 2, 2019
बिचुकले कुटुंबातील प्रेम पाहून घरच्यांचे आनंदाश्रू वाहू लागले.
पाहा #BiggBossMarathi2 आज रात्री 9:30 वा. #ColorsMarathi वर. @abhijeetkellkar @GmKishori @VeenaJagtap @shivthakare_ @imsurveshivani @ArohWelankar @bhosle_rupali @Nehashitolefc1 @TheHeenaPanchal pic.twitter.com/wP0y4UoEHA
— Colors Marathi (@ColorsMarathi) August 2, 2019
दुसऱ्या बाजूला बिचुकले यांची पत्नी आणि दोन मुले आल्याने त्यांना अत्यंत आनंद झाला आहे. तसेच घरातील इतर सदस्यांना बिचुकले यांच्या आई देत असलेला सल्ला ऐकून डोळ्यात पाणी आल्याचे दिसले. तसेच त्यांच्या दोन मुलांना पाहून घरातील सदस्यांच्या चेहऱ्यावर हास्याची कळी खुललेली दिसून येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 02, 2019 06:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

