Bigg Boss Marathi 2 Episode 45 Preview: वीणा आणि रूपाली यांच्यामध्ये फूट; कोण होणार घराचा नवा कॅप्टन?
Rupali Bhosle (Photo credits: Twitter)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) च्या घरात नियम धाब्यावर बसवत घरात बेशिस्तपणे वावरणार्‍या स्पर्धकांना चाप बसवण्यासाठी बिग बॉसने काल (8 जुलै) स्वयंपाकघरातील लक्झरी सामान जप्त केलं आहे. सध्या केवळ मूलभूत आहाराच्या पदार्थांवर दिवस काढायची वेळ 9 स्पर्धकांवर आली आहे. त्यामुळे ही वेळ नेमकी कुणा- कुणाच्या चूकांमुळे आली याचा हिशोब मांडताना पुन्हा घरात खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात वीणा आणि रूपाली मधील वाद पुन्हा प्रकर्षाने समोर येणार आहेत. पहा आजच्या भागात काय होणार?

वीणा जगताप आणि रूपाली भोसले यांचे पहिल्या पासूनच घरात विशेष बॉन्ड पहायला मिळाले आहे. मात्र जसजसा खेळ पुढे सरकत आहे तसं या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी खेळाची समीकरणं बदलत आहेत. यासोबतीने शिव आणि वीणाची वाढती जवळीक रूपालीला तिच्या वीणाच्या नात्यामध्ये येत आहे असं वाटते. नुकत्याच घरात झालेल्या वादामध्ये रूपालीने वीणाला डावलत हीनाची बाजू घेतल्यानेही ती दुखावली आहे. दरम्यान वीणा आणि रूपालीमध्ये इतकी दरी वाढली आहे की एकाच बेडवर झोपूनदेखील रूपालीला होत असलेला त्रास वीणाने दुर्लक्षित केला आहे असा दावा रूपालीने आज प्रोमो मध्ये केला आहे. आतापर्यंत काय झालं?

वीणा आणि रूपाली यांच्या वादासोबतच कॅप्टन्सी टास्कमध्ये रूपाली विरूद्ध अभिजीत केळकर हा खेळ देखील पहायला मिळणार आहे.