BBMarathi 2 (Photo Credits: Voot.com)

बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) च्या घरात नव्या आठवड्याला सुरूवात झाली की नवं भांडणं सुरू होतंच. आजपासून सुरू झालेल्या नव्या आठवड्यात नॉमिनेशन पासून बचावण्यासाठी देण्यात आलेल्या कार्यातही सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) आणि नेहा शितोळे (Neha Shitole) यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे. मागील आठवड्यात नेहा शितोळे आणि वैशाली सोबत गैर वर्तणूक करत बिग बॉसच्या घरातला महत्त्वाचा नियम मोडल्यामुळे पराग कान्हेरेला (Parag Kanhere)  घराबाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे आता घरात कसं वातावरण असेल? याची घरात उत्सुकता वाढली आहे. पहा आत्तापर्यंत बिग बॉसच्या घरात काय झालंय? 

मागील आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रिया असली तरीही घरातून बाहेर सदस्य आऊट होणार नव्हता. पण आज घरात पार परडणार्‍या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये घरातून बेघर होण्यासाठी खेळावर आधारित नियमांनुसार प्रत्येकी दोन सभासदांची नावं घेऊन अखेर नॉमिनेशनमध्ये कोण येतंय? हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पहा आजच्या भागात काय होणार?

नव्या नॉमिनेशन टास्कमध्ये आज पुन्हा सुरेखा पुणेकर संचालक आहेत. यामध्ये पाण्याच्या मार्‍यापासून स्वतःचे अधिकाधिक वेळ रक्षण करायचे आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला केवळ पाण्याचा मारा करून पोल वर  उभ्या असलेल्या स्पर्धकाला हटवायचे आहे.

दिवसागणिक जसा खेळ पुढे सरकत आहे तशी खेळातील गंमतही वाढत आहे. यंदा सुरूवातीपासून बिग बॉस मराठीच्या घरात तणावाचं वातावरण आहे. शिवानी सुर्वे, अभिजीत बिचुकले आणि पराग कान्हेरे हे नॉमिनेशन प्रक्रियेतून घरातून बाहेर पडलेले नाहीत.