Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

बिग बॉस मराठी सिझन 2 च्या घरात सध्या काही दिवसांपासून वातावरण तापलेले आहे. तसेच कॅप्टनपदी आता वैशाली म्हाडे हिची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता बिग बॉसने घरातील स्पर्धकांना एक टास्क दिले असून 'शेरास सव्वा शेर' असे त्याचे नाव आहे. या टास्कमध्ये सदस्यांना वाटेल त्या स्थानकांवर उभे राहून त्याबद्दल चर्चा करायची आहे. मात्र या टास्कदरम्यान पुन्हा एकदा ठिगणी उडणार असून रुपाली भोसले आणि अभिजित बिचुकले यांच्यामध्ये जोरदार वाद होणार आहेत.

घरातील स्पर्धकांना आज एक टास्क दिला असून त्यामध्ये कोण वरचढ आहे आणि का त्यानुसार दिलेल्या क्रमांकाच्या इथे उभे राहायचे आहे. त्याचसोबत सदस्य ज्या क्रमांकावर उभा आहे त्याचे कारण बिग बॉसला पटवून द्यायचे आहे असा या एकूण टास्कचा भाग आहे. मात्र टास्कदरम्यान बिचुकले 4 क्रमांकाच्या येथे जाऊन उभे राहतात. परंतु रुपाली हिला 4 क्रमांकावर उभे राहयाचे होते. दरम्यान या प्रकारामुळे रुपाली बिचुकले यांच्यावर संतप्त होऊन मुलीची शपथ घ्यायला लावतात. यामुळे बिचुकले एवढे वैतागतात की खेळात मुलीला मध्ये आणायचे नाही असे ठणकावून सांगतात.

(Bigg Boss Marathi 2, 17 June, Episode 23 Updates: कॅप्टन होण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये धक्काबुक्की; यंदाच्या आठवड्यात वैशाली माडे ठरली कॅप्टन)

तसेच बिचुकले आणि रुपाली यांच्या वादानंतर पुन्हा दुसऱ्या स्पर्धकांमध्ये होतात. तेव्हा किशोरी शहाणे आणि अभिजित केळकर यांच्यात वाद होत यापू्र्वी झालेल्या चोरपोलिस खेळामधील वादाचा मुद्दा येथे उपस्थित करतात. त्यामुळे आज सदस्यांमध्ये झालेले वाद कुठपर्यंत जातो हे पाहणे उत्सुकाचे असणार आहे.