Bigg Boss Marathi 2 Day 9 Episode Preview: साताऱ्यामध्ये परतीचे पेढे तयार ठेवा? बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांचा पराग वरील राग अनावर
Bigg Boss Marathi 2 (Photo Credits-Twitter)

Bigg Boss Marathi 2 Day 9 Episode Preview: अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) सध्या बिग बॉसच्या घरात आल्यापासून सक्रिय आहेत. तसेच बिचुकले यांच्यावरुन दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरुन खिल्ली उडवली जाते. मात्र नवव्या दिवसाच्या एपिसोडमध्ये बिचुकले संतप्त झालेले दिसून आले.

अभिजित बिचुकले हे अंघोळीला गेले असता त्यांच्या बाथरुमची लाईट बंद करण्यात आली. तसेच नुकतीच अंघोळ झाल्यानंतर हातात ओली चड्डी घेऊन ते घरभर फिरत होते. मात्र त्यानंतर पराग कान्हेरे याने बिचुकले यांची खिल्ली उडवली. पराग बिचुकले यांच्याबद्दल साताऱ्याचे कंदी पेढे तयार ठेवा असे म्हणले. त्यामुळे बिचुकले यांना राग अनावर होत पराग बद्दल घरभर फिरत त्याच्या नावाच्या बोंबा मारु लागले.(Bigg Boss Marathi 2: अभिजित बिचुकले कधी नव्हे ते भडकले, ओली चड्डी घेऊन घरभर फिरले)

तसेच पराग याने बिचुकले यांची साताऱ्याचा नेता म्हणत बिग बॉसच्या घरातील कॅमेरासमोर त्यांची ओळख करुन दिली. मात्र बोलण्याबोलण्यातच पराग याने तुमचा साताऱ्याचा नेता पुढील आठवड्यात परत येत असल्याने तुम्ही पेढे तयार ठेवा असे म्हटले. या कारणावरुन बिचुकले ऐवढे संतप्त झाले आहेत की आता ते कोणाचे ही ऐकायला तयार नाहीत असे दिसून येत आहे.