Bigg Boss Marathi 2: अभिजित बिचुकले कधी नव्हे ते भडकले, ओली चड्डी घेऊन घरभर फिरले
Abhijeet Bichukale | (Photo credit: YouTube)

Bigg Boss Marathi 2, 4th June 2019, Day 9 Episode Updates: अभिजित बिचुकले हे तसे शांत व्यक्तिमत्व. काहीसे खेळखर, गप्पीष्ट, बडबडे आणि सतत गोंधळलेले आणि या गोंधळातून समोरच्या मनातही मोठा गोंधळ निर्माण करणारे. एकदम सिधेसाधे वाटणारे. पण, असे हे साधेभोळे वाटणारे अभिजित बिचुकले कधी नव्हे ते भडकले. ते पराग कान्हेरे याच्यावर भडकले होते. रागाच्या भरात बिचुकले बडबडत घरभर फिरत होते. पण, आपण नुकतेच अंघोळ करुन आलो आहोत आणि ओली चड्डी आपल्या हातात आहे याचा त्यांना विसर पडला होता. रागाच्या भरात ओली चड्डी घेऊन ते घरभर फिरत होते.  पराग यांनी अभिजित बिचुकले यांचे परतीचे स्वागत करण्यासाठी सातारचे कंदी पेढे तयार ठेवण्याचे अवाहन करत बिचुकले यांना डिवचले होते.

'बिचुकले तुमची चड्डी डायनिंग टेबलवर आहे'

विशेष म्हणजे पराग यांनी हे अवाहन अभिजित बिचुकले यांच्या खांद्यावर हात ठेवत कॅमेऱ्यासमोर केले होते. त्या वेळी बिचुकले हसत होते. मात्र, घरातील इतर सदस्यांनी त्यांना परागने केलेले अवाहन किती भयानक आहे हे सांगून बिचुकले यांना चावी दिली. झाले. बिचुकले पेटले. ते घरभर रागाने फणफणत फिरत होते.  पण, आपण नुकतेच अंघोळ करुन आलो आहोत आणि ओली चड्डी आपल्या हातात आहे याचा त्यांना विसर पडला होता. रागाच्या भरात ओली चड्डी घेऊन ते घरभर फिरत होते. अखेर वैशाली माडे यांनी आठवण करुन दिली, 'बिचुकले तुमची चड्डी डायनिंग टेबलवर आहे'.  बिचुकले यांना रागवलेले पाहून किशोरी शहाणे विज यांनाही आश्चर्य वाटले. अखेर माधवने समजवल्यावर बिचुकले शांद झाले

वैशाली माडे भडकली, रागाच्या भरात वीणा जगताप हिला चांगलेच सुनावले

नॉमिनेशन टास्कवरुन वैशाली माडे आणि वीणा जगताप यांच्यात बिग बॉसच्या घरात जोरदार वाजले. इतके की प्रकरण बापाचा उद्धार करण्यापर्यंत आणि एकमेकांचे संस्कार काढण्यापर्यंत पोहोचले. हा वाद एकमेकांना नॉमिनेट करण्यावरुन सुरु झाला. पण, गंमत अशी की वीणा आणि वैशाली या दोघीही एकमेकींना नॉमिनेट करु शकत नव्हत्या. पण, तरीही त्यांच्यात वाजले. याला जुन्या वादाची पार्श्वभूमी होती. साचलेल्या जुन्या वादाचे पर्यावसण आजच्या भांडणात झाले.

बिग बॉसने दिला निर्वाणिचा इशारा

बिगबॉसने घरातील स्पर्धकांना दिलेल्या नॉमिनेशन टास्कने आठवा दिवस चांगलाच गरमागरमीचा ठरला. दोन्ही टीममधील बहुतांश सदस्यांचे भवितव्य एकमेकांच्या हातातील पोपटात असल्याने सर्वच जण पोपट पिंजऱ्यात टाकण्यास घाबरत होते. इतके की, शेवटी टास्कच थांबला. अखेर बिग बॉसला निर्वाणीचा इशारा द्यावा लागला की, जर नॉमिनेशनसाठी कोणीही नॉमिनेशनचा पोपट पिंजऱ्यात टाकला नाही तर, सर्वांच स्पर्धकांना घराबाहेर काढले जाईल. यात प्रत्येक सदस्याच्या हातात एक पोपट होता आणि या पोपटावर स्पर्धकाचे नाव होते. अट अशी होती की, किमान सहा स्पर्धक नॉमिनेट व्हावेत. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना नॉमिनेट करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यात काहींना यश आले तर काहींना अपयश. काही सुरक्षित राहिले तर, काही नॉमिनेट झाले. हा टास्क करताना अभिजित बिचुकले यांनी पराग करंदीकर यांना नॉमिनेट केले. विणाने मधवला नॉमिनेट केले. माधवणे विणाला नॉमिनेट केले. विणा आणि मैथिली यांच्यात नॉमिनेशनवर पहिला भडका उडाला होता.