Bigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: वीणा जगताप हिच्या डोळ्यात शिव ठाकरे याला दिसतंय बरंच काही; घ्या जाणून
Bigg Boss Marathi 2 | (Photo Credit : twitte / Colors Marathi)

Bigg Boss Marathi 2, 15 July, Episode 51 Updates: बिग बॉस मराठी 2 हे पर्व आता बऱ्यापैकी गती घेतं आहे. घरातील स्पर्धक एकमेकांनी एकमेकांना बऱ्यापैकी जाणून घेतलेले दिसत आहे. या जाणून घेण्यात एक स्पर्धक म्हणून आणि व्यक्ती म्हणून असे बरेच कंगोरे आहेत. यात स्पर्धक शिव ठाकरे (Shiv Thackeray) आणि वीणा जगताप (Veena Jagtap) यांची जवळीक ही सध्या बिग बॉसच्या घरात बरीच चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, वीणा आणि शिव यांच्यातील संवादही तितकेच रोमँटीक आणि दोघेही जणून एकमेकांच्या प्रेमात पडलेत असेच आहेत. आजच्या एपिसोडमध्येही दोघांचे संवाद असेच पाहायला मिळाले.

आजच्या एपिसोडमध्ये शिव आणि वीणा यांच्यातील संवादात शिव विणाला सांगत होता की, तुझ्याबद्दल मला काहीतरी वाटतं आहे. वीणाही वाटते महाली तसंच वाटतंय या दोंघांमधील संवाद काहीसा पुढील प्रमाणे. अर्थात हा संवाद लिहिताना काही शब्द, वाक्य इकडेतिकडे झाली असण्याची शक्यता आहे. पण, संवादाचा आशय तोच आहे.

शिव ठाकरे: मला ना माझ्या कल्पनेतील व्यक्ती तू असल्याचा भास होतोय..

वीणा जगताप: हं.

शिव ठाकरे: तुझे डोळे, तुझे केस, तुझं व्यक्त होणं... काही तरी आहे..

वीणा जगताप: हं..

शिव ठाकरे:  तू ज्या गोष्टी मला सांगितल्या. तेव्हापासून मला तुझ्याबद्दल आणखी बरंच काही वाटतंय. तू ज्या गोष्टी मला सांगितल्या. त्या आता मला तुझ्या डोळ्यात दिसतायंत. खरं तर तुझ्या डोळ्यात मला बरंच काही दिसतंय.

वीणा जगताप: हं..

वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांच्यात या संवादावेळी बरेच बोलणे झाले. अगदी त्यांच्या वर्तनातूनही. वीणानेही त्याला बराचसा प्रतिसाद दिला. पण तो, हं, हो आणि एकदोन वाक्याच्या फारसा पलिकडे नव्हता. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2 Episode 51 Preview: नाराज शिवानी सुर्वेचे वीणा जगतापला खडे बोल, तर कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धक एकमेकांना घालणार साष्टांग नमस्कार, Watch Video)

तिला एकटीला खेळू दे... तू उगाच तिच्या पाठी पडू नको

दरम्यान, वीणा आणि शिव यांचा संवाद संपून वीणा शिवाणीसोबत बोलायला गेली. त्या वेळी अभिजित केळकर, वैशाली माडे आणि माधव यांनी शिव ठाकरे याची थोडी शाळा घेतली. हे सगळे असताना शिव वीणा आणि शिवाणी यांच्याकडे निर्देश करत शिवाणीला उद्देशून म्हणाला झाला हिचा ड्रामा सुरु. या वेळी झालेला संवाद असा.

शिव ठाकरे: (शिवाणीला उद्देशून) झाला हीचा ड्रामा सुरु

अभिजित केळकर: जाऊ दे ना यार.. तू नको फार लक्ष देऊ

शिव ठाकरे: नाही यार. मी नाही फार लक्ष देत.

अभिजित केळकर: (शिव याला उद्देशून) तू तिला (वीणा) सपोर्ट करण्याच्या नादात. भलताच आक्रमक होतोस. आक्रमक होता होता तू काही भलतंच करुन बसायचास.

वैशाली माडे: (शिव याला उद्देशून) अरे तिला एकटीला खेळू दे... ती आहे तितकी स्ट्रॉंग. तू उगाच नको तिच्या पाठी पडू..

कॅप्टन्सी कार्यासाठी समुद्रमंथन

बिग बॉसने या आठवड्यात कॅप्टनसी कार्यासाठी एक वेगळाच टास्क दिला. या टास्कमध्ये चक्क समुद्र मंथन करायचे आहे. या कार्यासाठी गार्डन एरियात समुद्र मंथनासाठी डोंगर. रुपाली आणि वीणा यांनी कार्यास सुरुवात करायची आहे. दोन्ही उमेदवारांनी कार्यासाठी डोंगर घुसळायचा आहे. डोंगर घुसळल्यानंतर एक कलशबाहेर येईल. जो उमेदवार अधिक कलश जमवेन तो  कॅप्टनसीसाठी योग्य उमेदवार मानला जाईल. त्यानंत बिग बॉस पुढील सूचना करेन. जो उमेदवार हे कार्य अधिक चांगल्या प्रकारे करेल तो कॅप्टनसीसाठी योग्य उमेदवार मानला जाईल.

वीणा जगतपा हिचे समर्थक: शिव, अभिजित, वैशाली, किशोरी

रुपाली हिचे समर्थक:  माधव, नेहा, हिना, शिवानी

बिग बॉसच्या घरात स्पर्धकांकडून साष्टांग नमस्कार

समुद्रमंथन टास्कमध्ये बिग बॉसने स्पर्धकांपुढे कार्य ठेवले की,  वीणा आणि रुपाली यांच्या समर्थकांपैकी एकाने अधिकाधिक साष्टंग नमस्कार घालायचे आहेत. यासाठी वीणा हिचा समर्थक म्हणून शिव तर रुपाली हिचा समर्थक म्हणून नेहा शितोळे यांनी जबाबदारी स्वीकारली. यात नेहा शितोळे हिने अधिक साष्टांग नमस्कार घातले. आणि या कार्यापुरती रुपाली विजयी झाली. पण, टास्क अद्याप पूर्ण झाला नाही.

शिवच्या हातावर वीणाच्या नावाचा टॅटू, तर रुपालीच्या नावाने हिनाने काढला टॅटू

समुद्रमंथन कार्यात बिग बॉसने कार्य दिले की, रुपाली आणि वीणा यांच्या समर्थकांपैकी एकाने आपल्या अंगावर एक परमनंट टॅटू काढायचा. या टास्कमध्ये शिवने वीणाच्या नावाचा तर, हिनाने रुपालीच्या नावाचा टॅटू काढला. बिग बॉसने दोघींना एकेक कलश दिला.