
हिंदी वाहिनीवरील वादग्रस्त तितकाच लोकप्रिय झालेला रिअॅलिटी शो बिग बॉसचे लवकरच 14 वे सीजन (Bigg Boss 14) सुरु होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. यंदा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) या घरात काय नवनवीन बदल असतील याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. ही प्रतिक्षा आता संपली असून नुकतेच या घराचे आतील फोटो सोशल मिडियावर प्रसिद्ध झाले आहेत. अपेक्षेपेक्षाही खूपच सुंदर आणि हटके घर यंदाही बनविण्यात आले आहे. यात कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाणार आहे.
फेस मास्क, ब्लॅक शर्ट आणि पँट घातलेला सलमानचा हटके लूक सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. Bigg Boss 14: सलमान खानचा शो बिग बॉस 14 मध्ये होणार 'Radhe Maa' ची एन्ट्री; समोर आला नवा प्रोमो (Watch Video)
बिग बॉस सीझन 14 येत्या 3 ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. या शोची थीम आणि सलमानचा लूक या सर्वांचीच प्रचंड चर्चा होत आहे.

बिग बॉस 14 च्या घरातील ताजे फोटोज समोर येत आहे. जेथे स्पर्धकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सुख-सोयीच्या दृष्टीने सर्व गोष्टींची काळजी घेतली जाणार आहे.

या फोटोमध्ये आपणा पाहिले तर आपल्याला दिसेल की इथे लिव्हिंग रुमपासून, बेडरूम, स्वयंपाक घर, डायनिंग रुम खूप प्रशस्त आणि मोठे बनविण्यात आले आहे.

आम्ही तुमच्यासाठी बिग बॉस 14 चे ताजे फोटोज घेऊन आलो आहोत. येथे तुम्ही बिग बॉस मॉल सुद्धा पाहू शकता. जिथे घरातल्या लोकांसाठी आवश्यक आणि लक्जरी बजेटशी निगडित वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


या घरात एक झाड देखील लावण्यात आले आहे. जो एक नैसर्गिक टच देईल.

त्याचबरोबर स्पॉन्सर्सकडून आकर्षक मेकअप रुम देखील येथे बनविण्यात आली आहे.

यंदा या शोमध्ये रुबीना दिलैक, राधे मां, निशांत सिंह मलकानी, जैस्मिन भसीन देखील पाहायला मिळतील.