Bigg Boss 13: सलमान खानच्या शो 'बिग बॉस 13' मध्ये हिना खानच्या एन्ट्रीने येणार नवा ट्विस्ट
Hina Khan in Bigg Boss 13 (Photo Credits: YouTube)

Hina Khan's Entry In Bigg Boss 13: बिग बॉस 11 स्पर्धक हिना खान पुन्हा एकदा बिग बॉस लेटेस्ट सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मजेदार टास्कसाठी हिना परत बिग बॉसच्या घरात येणार आहे. दरम्यान, तब्बल तिसऱ्यांदा हिना या सीझनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

सध्याच्या सीझनमधील टॉप -10 स्पर्धकांसमोर 'एलिट क्लब' हे मजेशीर आव्हान असणार आहे. या टास्कचा एक भाग म्हणून हिना खान विविध बाबींचा विचार करून अखेर निर्णय घेईल की कोणत्या स्पर्धकांना 'एलिट क्लब'चा भाग बनवायचे आहे ते.

आजपर्यंत लोक हिनाला बिग बॉस शोमधील सर्वात स्ट्रॉंग महिला स्पर्धक म्हणून ओळखतात. तिने आपल्या गेममधून हे सिद्ध केले की सीझन 11 मध्ये तिच्या सारखं दुसरं कोणी असूच शकत नाही.

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण करणार 'या' तारखेला लग्न; Details Inside

आणि म्हणूनच सूत्रांनी सांगितले आहे की, 'एलिट क्लब' च्या प्रणालीला हिनापेक्षा चांगलं समजू शकेल असं कोणीही नाही. म्हणूनच, हिनाच्या एंट्रीमुळे बिग बॉसच्या घरातील प्रत्येकजण आनंदित होतो."