Bigg Boss 13: राखी सावंत च्या नवऱ्याने बिग बॉस मधील स्पर्धकांना दिली केस करणार असल्याची धमकी; पाहा काय म्हणाला रितेश
Rakhi Sawant (Photo Credits-Instagram)

Rakhi Sawant's Husband Lashesh Out At Bigg Boss 13 Contestants: ड्रामा क्वीन राखी सावंतने लग्न केलं असल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं होतं. पण त्यात काहीही तथ्य नसल्याचं अनेकांचं मत होतं. अखेर तिच्या नवऱ्याने स्पॉटबॉय इ ला एक मुलाखत देत राखीचं खरंच लग्न झालं असल्याचं सांगितलं. राखीने एका एनआरआय सोबत विवाह केला आहे.

राखीचा नवरा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने चक्क बिग बॉस 13 मधील काही स्पर्धकांना धमकी दिली आहे. बिग बॉस मध्ये जे माझ्या पत्नीबद्दल काही बोलतील त्यांच्यावर मी केस कारेन असं म्हणत राखी सावंतचा नवरा रितेश याने धमकी दिली आहे.

बिग बॉस मधील काही स्पर्धक सखी सावंतचं नावं घेत तिची खिल्ली उडवत होते. त्यावर रितेशने स्पॉटबॉय इ कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, "माझी पत्नी आता या सीझनची स्पर्धक पण नाही. मग तरीही तिच्या नावाचा उल्लेख शोमध्ये का केला जातो? यापुढे जो कोणी राखीचा उल्लेख करेल त्याच्यावर मी केस कारेन. तसेच कलर्स वाहिनीला आणि एंडेमॉलला सुद्धा यासाठी जबाबदार पकडेन."

Bigg Boss 13: सलमान खान आजारपणामुळे सोडणार शो? फराह खान असू शकते नवी होस्ट

दरम्यान शोमध्ये, हिंदुस्थानी भाऊने शेहनाज गिलला 'राखी आंटी' म्हंटलं होतं तर रश्मी देसाई शेहनाजला 'पंजाब की राखी सावंत' म्हणत चिडवत असते.