Bigg Boss 13: सलमान खानने नकळत रिव्हिल केले विजेत्याचे नाव?
A still of Salman Khan from the sets of Bigg Boss. (Photo Credits: File Photo)

Bigg Boss 13 Winner Name: बिग बॉस 13 च्या फिनालेसाठी आता फक्त काहीच दिवस उरले आहेत. आणि सध्या बिग बॉस हाऊसमध्ये एकूण 8 स्पर्धक आहेत - सिद्धार्थ शुक्ला, असिम रियाज, रश्मि देसाई, माहिरा शर्मा, पारस छाबरा, विशाल आदित्य सिंह, आर्ती सिंह, शहनाज गिल. बिग बॉस 13 या सीझनमध्ये प्रेक्षकांना लव्ह स्टोरीसोबतच अनेक भांडणं पाहायला मिळाली. आणि यामुळेच हा शो युथमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला. दरम्यान, या शोचा होस्ट सलमान खान याने नुकत्याच पार पडलेल्या वीकेंडच्या वारमध्ये नकळत विजेता तर जाहीर केला नाही ना असा अनेक फॅन्सना प्रश्न पडला आहे. चला तर बघूया, नक्की या वीकेंड का वार मध्ये काय घडलं...

बिग बॉस 13 च्या विजेत्यांची ट्रॉफी कोणाला मिळणार यावरून सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा फॅन्समध्ये रंगलेल्या पाहायला मिळतात. अनेक अंदाज वर्तविण्यात येत आहेत. तथापि, नुकत्याच पार पडलेल्या वीकेंड का वार या एपिसोडमध्ये सलमानने विजेत्याबद्दल एक छोटीशी हिंट दिली आहे.

सलमान खान च्या डोक्यावर आहे 'या' माणसाचे कर्ज; कर्जाचा आकडा ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सलमान खानने वीकेंड का वारमध्ये लक्झरी बजेट टास्क दरम्यान शहनाज गिलला कन्फेशन रूममध्ये बोलवून काही प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न असा होता की, "आज फिनाले झाला और तुला ट्रॉफी मिळाली, तर तू काय करशील?" तिला सलमानने या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 3 पर्याय दिले. पहिला प्रत्यय होता की असिमला ती ट्रॉफी देईल, दुसरा पर्याय म्हणजे ती सिद्धार्थला ट्रॉफी देईल आणि शेवटचा पर्याय म्हणजे त रश्मीसोबत बसून रडेल. त्यावर शहनाज हस्ते आणि म्हणते की ती तिची ट्रॉफी कोणालाही देणार नाही, फक्त शेअर करायची असल्यास सिद्धार्थ सोबत करेल.

जरी सलमानने फक्त ही मस्करी केली असली तरी शहनाज खरंच हा शो जिंकली तर तुमची त्यावर प्रतिक्रिया काय असेल?