 
                                                                 बॉलीवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान आज टॉप अभिनेत्यांपैकी एक आहे. कोट्यवधी रुपये कमावणारा हा अभिनेता आपल्या चित्रपटांपासून ते अगदी रिऍलिटी शोपर्यंत सर्वच ठिकाणी दिसतो. त्याच्या नव्या प्रोजेक्टबद्दल तर तो नेहमीच आपल्या फॅन्सना सोशल मीडियाद्वारे सांगत असतो. परंतु, नुकताच त्याने आपल्या आयुष्यातील असा एक किस्सा सांगितला आहे जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सलमानने त्याच्या डोक्यावर असलेल्या एका कर्जाबद्दल सांगितले आहे.
सलमानने त्याच्या आयुष्यातील हा किस्सा नुकत्याच पार पडलेल्या 'उमंग 2020' या सोहळ्यादरम्यान सांगितला आहे.
त्याने सांगितले की एकदा अचानक त्याची सायकल बंद पडली असता तो जवळच्याच एका मेकॅनिककडे गेला. परंतु, तो घरातून शॉर्ट्सवर बाहेर पडला असलयाने पैसे आणायला मात्र विसरला होता. तेव्हा त्याने मेकॅनिकशी बोलताना विनंती केली की काका आतापुरता सायकल दुरुस्त करून द्या, मी नंतर पैसे देतो. असा म्हणताच त्यांनी सलमानला जी गोष्ट ऐकवली ती तो कधीही विसरू शकत नाही असं तो म्हणाला.
त्यांनी सलमानला सांगितले की खूप वर्षांपूर्वी तो असाच सायकल दुरुस्त करण्यासाठी आला होता आणि तेव्हाही त्याने पैसे दिले नव्हते. त्यामुळे सलमानचे सव्वा रूपये आजही त्या काकांकडे उधार आहेत असे त्याने सांगितले व या प्रसंगामुळे त्याला स्वतःचीच लाज वाटली.
तो नंतर जेव्हा पैसे द्यायला गेला तेव्हा मात्र त्या काकांनी पैसे घेतले नाहीत आणि म्हणूनच आजही सलमानच्या डोक्यावर त्या काकांचे कर्ज आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
