Bigg Boss 13: दीपिका पादुकोण स्पर्धकांना घेऊन जाते एक 'जॉयराइड' वर
Deepika Padukone in Bigg Boss 13

Deepika Padukone In Bigg Boss 13: अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना दिसणार आहे. नुकतंच या भागाचं शूट झालं असून दीपिकाने बिग बॉसच्या घरात खुपाच मजा केली आहे. इतकंच नव्हे तर तिने काही स्पर्धकांना आपल्यासोबत घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि त्यांना आपल्या “जॉयराइड” मध्ये सामील केले.

बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच विशाल आदित्य सिंह, मधुरिमा तुली, आरती सिंग, शहनाज कौर गिल आणि शेफाली जरीवाला या पाच स्पर्धकांना घराबाहेर पडण्याची संधी देण्यात आली. ते दीपिकाबरोबर एका लॉन्ग राईडसाठी बाहेर गेले होते.

बिग बॉस 13 च्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये दीपिकाने लक्ष्मी अग्रवाल आणि तिचा छपाक मधील सहअभिनेता विक्रांत मस्सीसोबत घरात प्रवेश केला. त्यांनी स्पर्धकांना एक कार्य दिले.

कार्यादरम्यान, घर दोन संघात विभागले गेले होते. टीम A मध्ये रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा, माहिरा शर्मा आणि असीम रियाज आहेत तर टीम B मध्ये विशाल, मधुरिमा, शहनाझ, आरती आणि शेफाली आहेत.

टीम B रशमी आणि सिद्धार्थ यांच्यात झालेल्या प्रसिद्ध 'चाई फाईट' चा सीन सादर करते ज्यामुळे दीपिका आणि विक्रांत यांच्यासह सर्वच इम्प्रेस होतात. आणि म्हणूनच दीपिकाने टीम B ला विजेता घोषित केले.

छपाक चित्रपट 15 जानेवारीनंतर चित्रपटगृहात दाखवता येणार नाही? न्यायालयाने दिलेल्या आदेशामागचे नेमके कारण काय? घ्या जाणून

दीपिका म्हणाली की पहिल्यांदाच विजयी संघ तिच्यासोबत 'जॉयराइड' साठी घराबाहेर जाईल. त्यानंतर टीम B मधील सदस्य दीपिकासोबत एका ओपन जीपमध्ये ड्राईव्हला जातात.