जसलीनचा पोल डान्स (Photo Credit : Twitter)

रियालिटी शो बिग बॉसची सर्वच पर्व गाजतात. त्यात कोणी ना कोणी स्पर्धक सतत चर्चेत असतात.  पण सध्या बिग बॉस 12 मधील जसलीन आणि अनुप जलोटा यांची जोडी लक्षवेधी ठरत आहे. सतत चर्चेत असलेली ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. आता शो चा नवा व्हिडिओ समोर आला आहे. त्यात जसलीन मथारु पोल डान्स करताना दिसत आहे.

पण तिच्या या पोल डान्सचे वैशिष्ट्य म्हणजे यात तिचे पोल बनले आहेत अनुप जलोटाजी. त्यांच्या भोवती जसलीनने तिच्या दिलखेचक अदा दाखवल्या आहेत. जसलीननंतर कॉमेडियन भारती सिंगने तिच्या कॉमेडी अदा पोल डान्सच्या माध्यमातून सादर केल्या.

नेहा पेंडसेचा पोल डान्स

बिग बॉस 12 मधील मराठमोळा चेहरा म्हणजे नेहा पेंडसे. अभिनेत्री नेहा पेंडसे तिच्या पोल डान्समुळे चांगलीच चर्चेत होती. आता तिने तिची ही कला बिग बॉसच्या घरात सादर करुन घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना चांगलेच खूश केले आहे. बिग बॉसच्या घरात नेहा पेंडसेचा बोल्ड अंदाज, पोल डान्स वेधणार पुन्हा लक्ष (Video)