बिग बॉसचे 12 वे पर्व नुकतेच सुरु आहे. बिग बॉसच्या घरात आता एक मराठमोळा चेहरा दिसत आहे. तो म्हणजे अभिनेत्री नेहा पेंडसेचा. नेहाने मराठी, दाक्षिणात्य, हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या स्त्री सिनेमात 'मिलेगी मिलेगी' या गाण्यावर थिरकत तिने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. सलमान खानसोबत फ्लर्ट करण्याची संधीही तिने सोडली नाही. यामुळेच सध्या नेहा चांगलीच चर्चेत आहे.
नेहा सोशल मीडियावर अतिशय अॅक्टीव्ह असून आपले फोटोज, व्हिडिओज ती सातत्याने शेअर करत असते. तिचा पोल डान्सही लोकप्रिय आहे. बिग बॉस 12 : नेहा पेंडसेचे हॉट पोल डान्स व्हिडिओज
आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांना घायाळ करणारी नेहा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. तिचे वडील बिजनेसमन असून आई गृहिणी आहे.
आईच्या पाठींब्यामुळेच तिने अभिनय क्षेत्रातील कारर्दीला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केलेल्या नेहा वयाच्या 10 व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. त्या कामाचे तिला 500 रुपये मिळाले होते. ते पैसे तिने आपल्या पालकांच्या स्वाधीन केले होते.
त्यानंतर अनेक मालिका, शोज, सिनेमांमध्ये झळकली. नटसम्राट या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 'मे आय कम इन मॅडम,' 'पाटर्नस' या मालिकांमध्येही तिने काम केले आहे.