Bigg Boss 12 : बिग बॉसच्या घरात नेहा पेंडसेचा बोल्ड अंदाज, पोल डान्स वेधणार पुन्हा लक्ष  (Video)
नेहा पेंडसे पोल डान्स (photo credits Instagram)

नेहा पेंडसे हे नाव मागील काही दिवसांपासून पोल डान्समुळे खास चर्चेमध्ये आलं होतं. सोशल मीडियावर नेहाचे पोळ डान्स व्हिडीओ खूप चर्चेचा विषय बनला होता. आता त्याची झलक बिग बॉसच्या घरात देखील पाहायला मिळणार आहे. नेहा पेंडसे आज घरातील सदस्यांसमोर खास पोल डान्स करणार आहे.  बिग बॉस १२ : नेहा पेंडसेचे हॉट पोल डान्स व्हिडिओज

यंदा बिग बॉस 12 मध्ये जोडी विरुद्ध सिंगल्स असा सामना रंगणार आहे. नेहा पेंडसे सिंगल म्हणून घरात गेली आहे. मागील आठवड्यात नेहा पेंडसे बिग बॉसच्या घरात कॅप्टन होती. शांत आणि संयमाने नेहाने टास्क केल्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील नेहाच्या चाहत्यांनी तिची तुलना बिग बॉस 11 विजेती शिल्पा शिंदे सोबत केली होती. Bigg Boss 12 स्पर्धक नेहा पेंडसे अभिनयासोबतच 'या' क्षेत्रातही तरबेज !

बिग बॉसचा होस्ट सलमान खान सोबतच्या विकेंडचा डाव भागात अभिनेता गोविंदा आणि कॉमेडी क्वीन भारती सिंग हजेरी लावणार आहे. भारती केवळ सलमान सोबत नव्हे तर स्पर्धकांसोबतही दिसणार आहे. भारती बिग बॉस च्या घरात जाऊन स्पर्धकांसोबत धम्माल मस्ती करणार आहे.