नेहा पेंडसे Neha-Pendse photo credit : facebook

बिग बॉसचं 12 वं पर्व सुरू झालं आहे. सलमान खान सलग 9व्या वेळेस या शोचं सूत्रसंचलन करत आहे. यंदा बिग बॉसच्या घरात सिंगल्स विरूद्ध जोडी असं युद्ध रंगणार आहे. बिग बॉसच्या 12व्या पर्वामध्ये 17 स्पर्धकांचा समावेश आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री नेहा पेंडसे. मराठी सिनेमा, मालिकेमधून नेहा रसिकांच्या भेटीला येते. मात्र कलाक्षेत्रापलिकडेही नेहा पेंडसे काही खास गोष्टी आवडीने करते. पहा नेहा पेंडसेच्या अशाच काही तुम्हांला फारशा परिचित नसलेल्या खास टॅलेंटबद्दल

नेहा पेंडसे ही बालकलाकार म्हणून कलाक्षेत्रात आली. अवघ्या 10 व्या वर्षी नेहाने 'हसरते' या हिंदी मालिकेमध्ये काम केले आहे.  बिग बॉस 12 : इतकी होती नेहा पेंडसेची पहिली कमाई ! 

नेहा पेंडसे मूळची मुंबईची आणि मराठी असली तरीही तिने हिंदी, मराठीसोबतच काही दक्षिण भारतीय भाषांमध्येही काम केले आहे. नेहाने एकूण 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.

भाग्यलक्ष्मी या झी मराठीवरील मालिकेने नेहाला 'काशी' ही ओळख दिली. त्यानंतर 'एका पेक्षा एक अप्सरा आली..' या सेलिब्रिटी विशेष रिअ‍ॅलिटी शोमध्ये नेहा थिरकली होती. नेहा प्रशिक्षित शास्त्रीय नर्तिका आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित 'नटसम्राट' या सिनेमात नेहाने मुख्य भूमिकेतील नाना पाटेकरांच्या सूनेची भूमिका साकारली आहे.

मराठीप्रमाणेच नेहाने हिंदी टेलिव्हिजनवरही काम केले आहे. 'मे आय कमिंग मॅडम' नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये 'प्रेझेंटर'म्हणून झळकली होती.

कलाक्षेत्राप्रमाणेच नेहा पडद्यामागेही तितकीच डॅशिंग आणि बोल्ड आहे. नेहा पेंडसे सर्टिफाईड पिस्तुल शूटर आहे.

पोल डान्सिंग हा नृत्याचा एक हटके प्रकार नेहा पेंडसेला आवडतो. नेहा पेंडसेच्या पोल डान्सचे अनेक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यासाठी वर्षभर नेहाने खास प्रशिक्षण घेतले आहे.   बिग बॉस १२ : नेहा पेंडसेचे हॉट पोल डान्स व्हिडिओज