Bigg Boss 12 च्या घरात भारती सिंगची एन्ट्री, अनुप जलोटांसोबत खास डान्स
बिग बॉस १२ (Photo Credit: Twitter)

बिग बॉस 12 हळूहळू रंगायला लागलं आहे. यंदा बिग बॉसच्या या पर्वामध्ये सिंगल्स विरुद्ध जोडी असा सामना रंगत आहे. बिग बॉस 12 ची घोषणा झाल्यानंतर कॉमेडी क्वीन भारती सिंग तिच्या पतीसह बिग बॉस मध्ये सहभागी होणार असल्याचं वृत्त होतं. मात्र हा पब्लिसिटी स्टंट किंवा आजारपणामुळे त्यांची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली नाही. मात्र आज सलमान खान सोबत भारती सिंग ' विकेंड का दाव मध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर भारती सिंग घरात स्पर्धकानांही भेटली .

खास डान्स

 

View this post on Instagram

 

Kal dekhiye...kon hoga ghr se bahar ...lol 😅😅😅 . . . Follow @realitygyan for mote

A post shared by REALITYGYAN ( BB12 Khabri ) (@realitygyan) on

बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर भारती सिंग नेहा पेंडसे, अनुप जलोटासह इतर स्पर्धकांसोबत थिरकताना दिसली. भारती सिंगने अनुप जलोटांसोबत ' जरा जरा टच मी' या गाण्यावर थिरकली. अनुप आणि भरती सिंगचा हा डान्स आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. विकेंड च्या डाव मध्ये सलमान खान आणि गोविंदाची धम्माल मस्तीही पाहायला मिळणार आहे.