लोकप्रिय रियालिटी शो 'बिग बॉस 11' (Bigg Boss 11) विजेती शिल्पा शिंदे (Shilpa Shinde) लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्या उपस्थितीत लवकरच शिल्पा शिंदेचा पक्षप्रवेश होईल. (सलमान खानच्या 'या' चित्रपटामधून शिल्पा शिंदे करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण)
शिल्पा शिंदेचा प्रचंड चाहतावर्ग असून तिची लोकप्रियता पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे. 'भाभी जी घर पर है' या मालिकेतून शिल्पा शिंदे घराघरात पोहचली. इतर मालिकांमध्ये काम करण्यास निर्मात्यांनी बंदी घातल्याने प्रचंड लोकप्रिय ठरलेली ही मालिका कालांतराने सोडण्याचा निर्णय शिल्पाने घेतला. बिग बॉस मधील हिना खान सोबतचे शिल्पाचे वाद आणि व्यक्तवं चांगलीच गाजली. मात्र हिनावर मात करत शिल्पा 'बिग बॉस'ची विजेती ठरली.
Mumbai: TV actress Shilpa Shinde joins Congress in presence of Sanjay Nirupam, President of Mumbai Congress Committee and party leader Charan Singh Sapra. pic.twitter.com/cBO5q6fTl6
— ANI (@ANI) February 5, 2019
मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या शिल्पाला दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊ आहे. तिने के. सी. कॉलेजमधून मानसशास्त्राचं शिक्षण घेतलं असलं तरी पदवी पूर्ण करण्यास तिला अपयश आलं.
निवडणूकीच्या तोंडावर अभिनेत्रींचा राजकारणातील प्रवेश लक्षवेधी ठरत आहे. काही दिवासांपूर्वीच अभिनेत्री ईशा कोप्पीकरने भाजप पक्षात प्रवेश केला होता.