रिअॅलिटी शो 'बिग बॉस' च्या 11 (Bigg Boss 11) व्या पर्वातील एका अभिनेत्रीने आपल्या मित्रावर बलात्काराचे आरोप लावले आहेत. त्याने फ्लॅटवर बोलावत आपल्यावर बलात्कार केल्याचा अभिनेत्रीचा दावा आहे. सध्या या पीडीत अभिनेत्रीने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करत FIR नोंदवला आहे. 'आजतक' च्या रिपोर्ट्स नुसार, ही महिला यापूर्वी देखील खूप चर्चेत आणि वादामध्ये राहिलेली आहे. बिस बॉस च्या 11 व्या सीझन मध्ये ती खूप चर्चेमध्ये होती दरम्यान त्यानंतर तिला कोणतेही विशेष काम मिळाले नाही तसेच ती प्रसिद्धीच्या झोतापासूनही दूर होती. पोलिसांनी पीडीत महिलेची तक्रार नोंदवून घेतली आहे. दरम्यान तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे. साऊथ दिल्ली मध्ये या अभिनेत्रीने आपली तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
'बिग बॉस 11' मध्ये सहभागी स्पर्धकांमध्ये शिल्पा शिंदे, अर्शी खान, हिना खान, बेनाफ्शा सूनवाला, विकास गुप्ता, हितेन तेजवानी, प्रियांक शर्मा, पुनेश, आकाश ददलानी, लव, बंदगी कालरा, सपना चौधरी, मेहजबी, शिवानी यांचा समावेश आहे. दुर्गा, ज्योती कुमारी, झुबेर खान, सब्यसाची सत्पती आणि ढिंचेक पूजा या नावांचा देखील समावेश होता. Mumbai Shocker: इंस्टाग्राम वरील मैत्री 21 वर्षीय तरूणीसाठी ठरला 'Traumatic Experience'; नशेत असल्याचा फायदा घेऊन बलात्कार .
नुकताच बिग बॉस 17 चा ग्रॅन्ड फिनाले पार पडला आहे. मुनव्वर फारुकी या पर्वाचा विजेता ठरला आहे. अभिषेक कुमार फर्स्ट रनर अप तर मन्नारा चोप्रा सेकंड रनर अप ठरली. तर अंकिता लोखंडे हिला चौथ्या क्रमांकावर घरातून बाहेर जावं लागलं.
बिग बॉस हा हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय आणि तितकाच चर्चेमध्ये राहिलेला रिअॅलिटी शो आहे. अभिनेता सलमान खान या शो चा होस्ट आहे. त्याच्या दबंगस्टाईल मधील स्पर्धकांची हजेरी घेण्याची पद्धत अनेक प्रेक्षकांना आवडते.