सोशल मीडीयावरील मैत्री एका तरूणीला हादरवून सोडणारा अनुभव ठरला आहे. 21 वर्षीय मुलीला ड्रग्स देऊन तिच्यावर बलात्कार (Rape) केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेला 12 दिवस उलटले आहेत मात्र अद्याप आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आलं नसल्याची माहिती समोर आली आहे. इंस्टाग्राम वर पीडीतेने या अनुभवाला 'जीवनातील सर्वात धक्कादायक अनुभव' असं म्हटलं आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, तरूणी इंस्टाग्राम वर ओळख झालेल्यासोबत पार्टीला गेली होती. सुरूवातीला ती त्याच्यासोबत ड्रिंक्सला गेली होती नंतर त्यांना तिथे आरोपीचेही मित्र भेटले. नंतर ते दुसर्या रेस्टॉरंटला गेले. तेथे आरोपीने तिला पुन्हा दारू पिण्यास सांगितलं. दारू प्यायल्यानंतर तिला सारं ब्लॅक आऊट झाल्याचं ती सांगते. tequila shots नंतर तिला नशा चढण्याचं जाणवत होतं. मात्र आरोपी अशा परिस्थितीतही अजून पिण्यासाठी हट्ट करत राहिला. पोस्ट मध्ये तरूणीने लिहलेल्या माहितीनुसार नंतर काय घडलं हे तिला आठवत नाही.
तरूणीने जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा आरोपी तिच्यावर बलात्कार करत असल्याचं समजलं. त्याचा तिने विरोध केला पण आरोपीने तिच्या कानशिलात लगावत तिला त्रास देणं सुरूच ठेवलं. तिच्या दाव्यानुसार हा प्रकार आरोपीच्या मित्राकडे झाला आणि मदत मागू नये म्हणून धमकावले. नंतर कुटुंबियांना सारा प्रकार सांगून त्यांच्याकडून मदत घेत स्वतःची सुटका करून घेतली आहे. त्यानंतर पोलिसांत FIR नोंदवला. नक्की वाचा: Indore Rape case: आयआयटी इंदूरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थींनीवर बलात्कार, आरोपी मित्राला अटक .
आरोपीने माफी मागितली आहे. या प्रकरणामध्ये त्याने अटकपूर्व जामीन देखील अर्ज केला आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तरूणीने पोलिसांना वेळीच हा प्रकार सांगितल्याने आभार मानत आरोपीचा शोध सुरू असल्याचं म्हटलं आहे.