Indore Rape case: मध्य प्रदेशातील आयआयटी इंदूरमध्ये एका विद्यार्थ्यींनीवर तिच्या बॅचमेटने प्रयोगशाळेत बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केले आहे. पीडित तरुणी भोपाळ येथील रहिवाशी आहे. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी आयआयटी इंदूरमध्ये पीएचडी पूर्ण करत आहे. काही महिन्यांपूर्वीच आरोपी आणि पीडित तरूणीचा भेट झाली होती. (हेही वाचा- सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, मालाड पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेवर संस्थेच्या प्रयोगशाळेत बलात्कार केला. दोघे ही चांगले मित्र बनले होते. एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. तरुणाने प्रेमाची कबुली करत तीला महिन्यांपूर्वी लग्नाचे आश्वासने दिले. या गोष्टीला पीडितेने नकार दिला. त्यानंतर आरोपीने लॅबमध्ये तिच्या संमती शिवाय तिच्याशी शारिरीत संबंध ठेवला असा पीडितेने आरोप केला आहे. पीडितेने अनेकदा नकार दिला, आणि विरोध करण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीने तिला धमकी दिली. याचे तुला गंभीर परिणाम भोगवे लागतील अशी धमकी देऊन अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीने शारिरिक संबंध ठेवले.
घाबरून पीडित तरुणीने याबाबतीत कोणालाही काही सांगितले नाही. त्यानंतर ती तणावात गेली. अखेर तरुणीने आई वडिलांना या बाबतीत तिने खुलासा केला. पालकांच्या मदतीने तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिस ठाण्यात आरोपीविरुध्द कलम ३७६ आणि ३७६ (२) (एन) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी इंदौर पोलिस तपासणी करत आहे.