बिग बॉस 14 मधील सिद्धार्थ शुक्ला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शोच्या नवीन फॉरमॅटनुसार यावेळेस सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान आणि हिना खान हे तूफानी सीनियर्स म्हणून दाखल झाले आहेत.मात्र या सगळ्यांमध्ये सिद्धार्थ ची चर्चा सर्वात जास्त होताना दिसत आहे. मागील सीजन मधील विजेता सिद्धार्थचा या सीजन मधील स्पर्धक पवित्रा पूनियासोबतचे जूने फोटोशूट व्हायरल होत आहे.
दरम्यान व्हायरल हा होणारा व्हिडिओ 'लव्ह यू झिंदगी' या शो मधील ती क्लिप आहे. यात दोघेही ग्लॅमरस फोटोशूट करत आहेत. 9 वर्षां पूर्वीच्या या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ पांढर्या शर्टमध्ये दिसत आहे. तर पवित्रने सिफॅान साडी नेसली आहे. या दोघांमध्ये बरीच आश्चर्यकारक केमिस्ट्री पहायला मिळत आहे.या शूटनंतर अशीही अफवा पसरली होती की, सिद्धार्थ-पवित्रा एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, नंतर सिद्धार्थने ते फक्त मित्र असल्याचे सांगितले होते.
बिग बॉसच्या या सीझनमध्येही सिद्धार्थचा रोमांस तसाच आहे.नुकत्याच दिलेल्या टास्कमध्ये त्याला सर्व फ्रेशर मुलींबरोबर ग्लॅमर डान्स करण्याची संधी मिळाली. या व्यतिरिक्त, सिद्धार्थवर प्रभाव पडणाऱ्या एका टास्कमधील सहभागींना सिद्धार्थकडून टॅटू काढून घ्यायचा होता. यावेळी पवित्र आणि सिद्धार्थ यांची केमेस्ट्री पहायला मिळाली होती. तर शेवटी पवित्रा ने सिद्धार्थला साइड किस ही केले होते.