सपना चौधरी (Photo Credits: Instagram)

बिग बॉस सीजन 12 मध्ये टीआरपी वाढवण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बॉसमध्ये सीजन 11 चे स्पर्धक विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे झळकले होते. आता शो मध्ये सपना चौधरीची एन्ट्री होणार असल्याचे समोर येत आहे.

बिग बॉसच्या घरातील माहिती देणारे ट्विटर हँडल 'खबरी'ने याबद्दलची माहिती दिली आहे. आता 'खबरी' कडून मिळालेली माहिती खरी ठरते का? खरंच सपना चौधरीची बिग बॉसच्या या सीजनमध्ये एन्ट्री होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रत्येक सीजनमध्ये दिवाळीच्या निमित्ताने जुने स्पर्धक बिग बॉसच्या नव्या घरात प्रवेश करत असतात. यंदा देखील आपली प्रथा कायम ठेवण्यासाठी जूने स्पर्धक शो मध्ये सहभागी होतील. पाहुणे म्हणून आलेले हे स्पर्धक नव्या स्पर्धकांना टिप्स देतील आणि त्यांच्या परफॉर्मन्सबद्दलही बोलतील.

सपना चौधरीचा डान्स अत्यंत प्रसिद्ध आहे. बिग बॉसमधून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी तिचा डान्सचं कारणीभूत ठरला. शो मधून बाहेर पडताच सपना चौधरीकडे सेलिब्रेटी म्हणून पाहिले जावू लागले. त्याचबरोबर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात गेली. सपनाचा डान्स पाहण्यासाठी तिचे चाहते अतिशय उत्सुक असतात.