Sumit Pusavale Wedding Photos: 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतील सुमित पुसावळेने जळगावच्या मोनिका महाजनसोबत लग्नगाठ बांधली आहे. आज 14 डिसेंबरला सांगोला येथे सुमित आणि मोनिका यांचा लग्नसोहळा पार पडला. सुमितच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या असून सुमित आणि मोनिका यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सुमित पुसावळे याने आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. पण सुमितला खरी लोकप्रियता बाळूमामा मालिकेतून मिळाली. गेल्या तीन वर्षांपासून ही मालिका सुरू असून प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे या मालिकेचा टीआरपीही अव्वल आहे. या मालिकेत बाळूमामांच्या तरूणपणापासून ते त्यांच्या वार्धक्यापर्यंतच्या अनेक छटा दाखवण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार हॉरर ड्रामा; 'ती'ला पाहून घरातील सदस्यांची झाली पळापळ)
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
सुमितने यापूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवरून प्रीवेडिंग फोटो तसेच व्हिडिओ शेअर केले आहेत. उनका हात पकडना तो एक बहाना था, मकसद तो लकीरोंसे लकीर जोडना था, अशी कॅप्शन सुमितने मोनिकासोबतच्या फोटोला दिली होती. तर शी सेड येस असं म्हणत त्याने दुसरा फोटो शेअर केला होता. त्यानंतर सुमित लग्न करत असल्याची बातमी मीडियामध्ये पसरली. अखेर आज सुमित आणि मोनिका लग्नबंधनात अडकले. अनेक मराठी टेलिव्हिजन कलाकारांनी सुमितला शुभेच्छा दिल्या आहेत.