Avika Gor (Photo Credit : Instagram)

टीव्ही सीरियल ‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गोर (Avika Gor) आता चक्क 23 वर्षांची झाली आहे. बालिका वधूनंतर ‘ससुराल सिमर का’ मधून तिला लोकप्रियता मिळाली होती. आता ती टीव्हीपासून दूर असूनही चर्चेत आहे. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त आहे, मात्र कुठल्याही प्रोजेक्टशिवाय अविका लाइमलाइटचा आनंद लुटत आहे. अविकाने फक्त तिच्या अभिनयातूनच प्रेक्षकांवर प्रभाव पाडला नाही, तर सोशल मीडियावरील फोटोमुळेही तिने चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अविका आजकाल सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. तिचे सध्याचे फोटोज पाहून विश्वासच बसणार नाही की तिच्यामध्ये इतका बदल झाला आहे.

अविका नेहमीच तिच्या अ‍ॅक्टिव्हिटी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अलीकडच्या काळात या अभिनेत्रीचे काही फोटो खूप पसंत केले गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविकाला कदाचित आनंदी बहू म्हणून ओळख मिळाली असेल, पण तिने दक्षिण इंडस्ट्रीमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बाल अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात करणारी अविका आता एक उत्तम प्रमुख अभिनेत्री बनली आहे. (हेही वाचा: Majha Hoshil Na Serial: 'माझा होशील ना' मालिकेत 'लाडू' फेम बालकलाकार राजवीर सिंह ची होणार एन्ट्री, साकारणार पंजाबी मुलाची भूमिका)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविकाने कन्नड, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2019 मध्ये तिने तेलुगू चित्रपट Raju Gari Gadhi 3 मध्ये काम केले होते आणि तेव्हापासून ती ब्रेकवर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविका सध्या अतिशय फिट झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तिने 10-12 किलो वजन कमी केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अविकाची ड्रेसिंग स्टाईलदेखील खूप सुधारली आहे. अविकाचा जन्म 30 जून 1997 रोजी मुंबईमध्ये झाला आहे.

तिच्या फोटोवरून दिसून येत आहे की ती सध्या मिलिंद चंदवानी नावाच्या व्यक्तीला डेट करत आहे.