अनीता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Anita Hassanandani and Rohit Reddy (Photo Credits-Instagram)

Anita Hassanandani and Rohit Reddy Welcome  Baby Boy: टेलिव्हिजनवरील अभिनेत्री अनीता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांच्या घरी आज एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनीता हिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनीतासह तिचा पती रोहित त्यांच्या नव्या बाळाबद्दल खुप खुश असल्याचे दिसून येत होते. अखेर त्यांना आज मुलगा झाल्याची गोड बातमी समोर आली आहे.(Anita Hassanandani ने बेबी बंम्पसह केलेला शकिरा डान्स झाला व्हायरल, Watch Video)

रोहित रेड्डी याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यात अनीता सुद्धा दिसून येत आहे. या फोटोला रोहित याने Oh Boy! असे कॅप्शन दिले आहे.(Virat-Anushka Baby Girl Vamika Meaning: विराट-अनुष्का च्या मुलीच्या 'वामिका' नावामागे दडलाय इतका सुंदर अर्थ, जाणून घ्या सविस्तर)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अनीता हिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लॅक आउटफिट मधील बेबी बंप फ्लॉन्ट करतानाच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले होते. त्यात ती अत्यंत सुंदर ही दिसत आहे. तिच्या या फोटोंना 1 लाखांहून अधिक लाइक केले गेले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

तर अनीता हिने टेलिव्हजनवर आपली एक वेगळीच ओखळ निर्माण केली आहे. शेवटी ती नागिन या कार्यक्रमातून झळकली होती. अनीता हिने नागिन 3 आणि नागिन 4 मध्ये मुख्य भुमिका साकारल्याचे दिसून आले होते. त्याचसोबत अनीता ही तिचा पती रोहित याच्यासोबत नच बलियेच्या 9 व्या सीझनमध्ये सु्द्धा झळकली होती.