Anita Hassanandani ने बेबी बंम्पसह केलेला शकिरा डान्स झाला व्हायरल, Watch Video
अनीता या व्हिडिओमध्ये आपल्या बेबी बंपसह शकिराचा डान्स छान एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओखाली 'एकदा जो कोणी शकिराचा फॅन होतो तो कायम शकीराचा फॅन राहतो' या आशयाचे कॅप्शन दिले आहे
लवकरच आई होण्याच्या उंबरठ्यावर असलेली अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) सध्या आपले गरोदरपण छान एन्जॉय करताना दिसत आहे. तिचे अनेक फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडिया वर व्हायरल होत असतात. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या बेबी बंपवर (Baby Bump) डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) होत असून अनेकांनी हा व्हिडिओ पसंत केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शकिराच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
अनीता या व्हिडिओमध्ये आपल्या बेबी बंपसह शकिराचा डान्स छान एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओखाली 'एकदा जो कोणी शकिराचा फॅन होतो तो कायम शकीराचा फॅन राहतो' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.हेदेखील वाचा- Anushka and Virat Kohli Spotted at Khar: अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला खार मधील क्लिनिक येथे करण्यात आले स्पॉट, पहा फोटो
View this post on Instagram
या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. बालाजी प्रोडक्शनच्या बॅनरखाली अनीताने अनेक मालिका केल्या आहेत. तसेच अनेक हिंदी चित्रपट देखील केले आहेत.
अनिताने ‘नागिन 4’ या मालिकेत काम केले होते. तिने विशाखा खन्नाची भूमिका साकारली होती. तसेच ‘नच बलिए 9’मध्ये तिने आणि तिच्या पतीने सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांची जोडी हिट ठरली होती. तसेच तिने ये हैं मोहब्बतें, कव्यांजली, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि कसम या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2021 08:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

