'खतरों के खिलाडी 10' मध्ये अमृता खानविलकर घेणार का सहभाग?
Amruta Khanvilkar | (Photo Credits: Instagram)

मराठी सिनेमा आणि बॉलिवूड जगतामध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) लवकरच 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या रिएलिटी शो मध्ये झळकणार आहे. यंदा 'खतरों के खिलाडी' चे यंदा 10 वे पर्व रंगणार आहे. त्यामुळे होस्ट रोहित शेट्टीच्या या बहुचर्चित शो मध्ये नेमके कोण-कोणते कलाकार झळकणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑगस्ट 2019 पासून 'खतरों के खिलाडी' चं शूटिंग सुरू होणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार पुढे आली आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृतानुसार खतरों के खिलाडी च्या यंदाच्या पर्वामध्ये अमृता खानविलकरला विचारणा करण्यात आली आहे. अमृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना तिने आपण 'खतरो के खिलाडी' मध्ये सहभागी व्हावं का? असा प्रश्न देखील विचारला होता. आता अमृता हा शो स्विकारणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.अमृता खानविलकरबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

अमृता खानविलकर सध्या 'जिवलगा' ही मराठी मालिका करत आहे. तर यापूर्वी तिने मराठी डान्स रिएलिटी शो मध्येही सहभाग घेतला होता. तसेच 'नच बलिये' हा सुपरहीट डान्स शो जिंकत तिने हिंदी आणि मराठी चाहत्यांची मनं जिंकली होती. इतर रिएलिटी शोच्या तुलनेत 'खतरों के खिलाडी' हा शो आव्हानात्मक आहे. अनेक स्टंट्स, अवघड आव्हानांचा टप्पा पार करत पुढे जाणं भाग आहे. यापूर्वी सोनाली कुळकर्णी ही मराठी अभिनेत्री खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होती.