Amruta Khanvilkar Birthday Special: अमृता खानविलकरबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
अमृता खानविलकर (Photo Credit : Instagram)

Amruta Khanvilkar Birthday Special: अभिनेत्री, नर्तिका, सुत्रसंचालिका अशी ओळख असलेली मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिचा आज 34 वा वाढदिवस आहे. मालिका, रियालिटी शोज सोबत तिने अनेक मराठी, हिंदी सिनेमात काम केले आहे. मात्र 'वाजले की बारा' या गाण्यातील नृत्याने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. 'नच बलिये' या डान्स रियालिटी शो मध्ये तिच्या अभिनयाचे कौशल्य पाहायला मिळाले.

'गोलमाल' हा अमृता खानविलकरचा पहिलावहिला मराठी सिनेमा. त्यानंतर तिने साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा अनेक मराठी सिनेमांत काम केले. त्याचबरोबर 'फुंक', 'फुंक 2,' 'राझी,' 'फिल्लम सिटी' या हिंदी सिनेमातही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'बोम्मयी' या तामिळ सिनेमातही अमृताने काम केले आहे.

अमृताचे लहान मुलांवर विशेष प्रेम आहे. ती नेहमीच आपला वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असते. पार्टी करण्यापेक्षा आपला आनंद ती मुलांसोबत शेअर करण्याकडे तिचा अधिक कल असतो. यासाठी ती अंध, मुक बधीर मुलांच्या शाळेत जाऊन वाढदिवस साजरा करत असते.

ग्लॅमरस अमृताची अजून एक खास बाजू आहे. ती म्हणजे तिची आध्यात्मिकता. खरी शांतता आणि आयुष्याचे सौंदर्य हे आध्यामित्कतेत असल्याचे अमृता मानते. भगवान शिव यांच्यावर तिची विशेष श्रद्धा आहे. त्याचबरोबर बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांचीही ती मनापासून आराधना करते. या देवतांवर असलेली श्रद्धा तिला नेहमीच चांगले काम करण्याची प्रेरणा देते, अशी तिची धारण आहे.

'इंडियाज सिनेस्टार की खोज' या कार्यक्रमाच्या सेटवर अमृताची हिंमाशू मल्होत्रा सोबत ओळख झाली. 10 वर्ष डेट केल्यानंतर अखेर 24 जानेवारी 2015 मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. हिंमाशू मल्होत्रा अभिनेता असून तो अनेक हिंदी मालिकांमध्ये काम करतो.