Alka Kubal and Prajakta Gaikwad Controversy: अलका कुबल यांनी घेतली उदयनराजे भोसले यांची भेट, प्राजक्ता गायकवाड ची भेट घेऊन वाद मिटविण्याचे दिले आश्वासन
Alka Kubal and Udayanraje Bhosle (Photo Credits: Twitter)

सोनी मराठीवरील (Sony Marathi) लोकप्रिय मालिका 'आई माझी काळूबाई' (Aai Mazi Kalubai) सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. याचे प्रमुख कारण यातील नुकतीच एक्झिट घेतलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) आणि ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांच्यातील वाद. त्याचबरोबर मालिकेच्या चित्रीकरणालाही येथील गावक-यांनी विरोध केला आहे. याप्रकरणी अलका कुबल यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. या भेटीत अलका कुबल आणि उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle)  यांच्यात बरीच चर्चा झाली. त्यावर उदयनराजे यांनी यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. यासंदर्भातील ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी काल (8 नोव्हेंबर) भेट घेतली. 'काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली,' असं उदयनराजे म्हणाले. हेदेखील वाचा- Aai Majhi Kalubai मालिकेतून प्राजक्ता गायकवाड ची एक्झिट; वीणा जगताप दिसणार मुख्य भूमिकेत

दरम्यान प्राजक्ता गायकवाड हिने मालिका अर्ध्यावर सोडल्यानंतर अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातही थोडा वाद झाला. प्राजक्ताला या मालिकेचे क्रू मेंबर विवेक याने शिवीगाळ केल्याचा आरोप तिने केले होता. याबाबत अलका कुबल यांच्याकडे तक्रार केली तरी त्यांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतर जेव्हा विवेक मला सेटवर समोर दिसायचा तेव्हा मला त्याने मला केलेली शिवीगाळ आठवायची. या एकमेव कारणामुळे मी मालिका सोडली,' असं प्राजक्ताने स्पष्ट केलं आहे.