Akshay Kumar | Photo Credits: Twitter

बॉलिवूडमध्ये 'खिलाडी' म्हणून ओळख असणार्‍या अक्षय कुमारने (Akshay Kumar) नुकताच Into The Wild With Bear Grylls चा एपिसोड केला. डिजिटल आणि टेलिव्हिजन माध्यमातून हा एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला आणि बघता बघता या एपिसोडने टेलिव्हिजन विश्वात एक रेकॉर्ड रचला आहे. दरम्यान अक्षय कुमार चा हा एपिसोडमुळे भारतामध्ये Infotainment क्षेत्रातील सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या शो च्या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकाचा एपिसोड ठरला आहे. infotainment म्हणजे information अर्थात माहिती आणि Entertainment म्हणजे मनोरंजन.

सोशल मीडीयावर अक्षय कुमारच्या या एपिसोडबद्दल खूपच चर्चा झाली होती. #KhiladiOnDiscovery हा हॅश टॅग तेव्हा ट्रेंडिंग होत होता. डिस्कव्हरी नेटवर्क चॅनलवर 1.1 कोटी लोकांनी एपिसोड पाहिला होता. तर डिस्कव्हरी नेटवर्क चॅनलच्या ओरिजनल आणि रिपीट्स भागांसह पहिल्या आठवड्यामध्ये 2.6 कोटी लोकांनी एपिसोड पाहिला आहे. हा एपिसोड अक्षयच्या चाहत्यांना Discovery+ वर 11 सप्टेंबरला त्यानंतर 14 सप्टेंबरला डिस्कवरी चॅनलवर टेलिकास्ट करण्यात आला. Akshay Kumar Drinks Cow Urine Every Day: अक्षय कुमार 'दररोज पितो गोमूत्र', Bear Grylls सोबतच्या Live Chat मध्ये खुलासा (Watch Video).

2020 च्या सुरूवातीला अक्षय कुमारने कर्नाटकात बंदिपूर टायगर रिझर्व्ह मध्ये या एपिसोडचं शूटिंग केले आहे. अक्षय कुमार पूर्वी Bear Grylls सोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी शूटिंग केले आहे. बेयर ग्रिल्स हा वाईल्ड लाईफ सोबत थरारक प्रसंगांचा सामना करतो. मात्र त्याचा हा प्रवास एकट्याचा नसतो. त्याच्यासोबत जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असतात. अक्षय कुमार हा बेयर ग्रिल्स सोबत शो करणारा पहिला बॉलिवूड कलाकार ठरला आहे. दरम्यान आता क्रिकेटर विराट कोहली देखील आगामी एपिसोड्समध्ये दिसू शकतो अशी चर्चा आहे.