Akshay Kumar's Into The Wild With Bear Grylls episode promo out (Photo Credits: Twitter)

अक्षय कुमार (Akshay Kumar) आता 53 वर्षांचा झाला आहे. कालच, 9 सप्टेंबर रोजी त्याने आपला वाढदिवस साजरा केला. पण या वयातही अक्षयचा फिटनेस हे एक मोठे रहस्य आहे. अक्षयची जीवनशैली खूप बांधील आहे. याआधी अनेकदा त्याने आपल्या झोपण्याच्या व उठण्याच्या वेळेबाबत भाष्य केले आहे. पण आता या वयातही अक्षयने स्वतःला कसे फिट ठेवले आहे किंवा त्याच्या फिटनेसमागे एक मोठे रहस्य उघड केले आहे. होय, अक्षय कुमारने लाईव्ह चॅटमध्ये खुलासा केला आहे की, तो रोज गो-मूत्र (Cow Urine) पितो. बीअर ग्रिल्स (Bear Grylls) सोबत इन्स्टाग्रामवर संवाद साधत असताना अक्षयने हे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्यानंतर अक्षय लवकरच बीअर ग्रिल्ससोबत जंगलाची सफर करताना दिसणार आहे.

पहा व्हिडीओ -

 

View this post on Instagram

 

@beargrylls @iamhumaq @discoveryplusindia @discoverychannelin

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

याआधी या शो चे काही प्रोमोसमोर आले आहेत. त्यानुसार अक्षय 'इन टू द वाइल्ड' (Into The Wild) मध्ये काही धोकादायक स्टंट करताना दिसणार आहे. शोच्या प्रीमियरच्या एक दिवस आधी अक्षयने बीयर ग्रिल्सशी थेट चॅट केले, ज्यात त्याने तो रोज गोमूत्र पीत असल्याचे रहस्य उघड केले. बीयर ग्रिल्सने नुकतेच अक्षय कुमार आणि त्याची बेल बॉटम सहकलाकार हुमा कुरेशी यांच्याबरोबर इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट सेशन केले. गप्पांच्या दरम्यान अक्षय आणि ग्रील्सने बांदीपूर नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्वमधील जंगल स्पेशल एपिसोडच्या शूटिंगबद्दल चर्चा केली. (हेही वाचा: रजनीकांत, अक्षय कुमारनंतर Bear Grylls च्या 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण आणि विराट कोहली)

पहा या शोचा प्रोमो -

यावेळी हुमाने त्याला 'हाथी पाव चाय' बद्दल विचारले की, तो शोच्या प्रोमोमध्ये मद्यपान करताना दिसला. यावेळी अक्षयने खुलासा केला की, आयुर्वेदिक कारणास्तव तो दररोज गोमूत्र पितो म्हणून ही त्याच्यासाठी खरोखर मोठी गोष्ट नाही. या दरम्यान ग्रील्सने कबूल केले की, अक्षय कुमारला तो वैयक्तिकरित्या ओळखत नसला तरी अक्षय हा 'अहंकार नसलेला मजेदार माणूस' आहे हे त्याला माहित होते. अक्षयच्या तंदुरुस्तीवर बीअर प्रभावित झाला आणि म्हणाला, 'आमच्याकडे अनेक वर्षांपासून आलेल्या सर्व पाहुण्यांपैकी अक्षय नक्कीच ‘टियर -1’ आहे.