Swwapnil Joshi As KUSH | Photo Credits: Twitter

भारतामध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लोकाग्रहास्तव रामानंद सागर यांची 'रामायण' मालिका सुरू करण्यात आली होती. त्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर आता उत्तर रामायण म्हणजे 'लव-कुश'ची कहाणी दाखवली जाणार आहे. या लव-कुशच्या जोडीमध्ये 'कुश'ची भूमिका साकारणारा स्वप्नील जोशी हा मराठमोळा कलाकार आहे. उत्तर रामायणच्या टेलिकास्टबद्दल स्वप्नील देखील उत्सुक आहे. आज त्याने ट्वीटरवर त्याच्या 'कुश' भूमिकेतील फोटो शेअर केला आहे. ट्वीटरवर त्याने कुशच्या भूमिकेतील फोटो प्रोफाईल पिक म्हणून देखील बदलला आहे. 'कुश' साकारताना स्वप्नील जोशी अवघा 9 वर्षाचा होता. तर ही त्याची कलाकार म्हणून पहिली भूमिका होती. आता पुन्हा 'कुश' च्या रूपात स्वप्नीलला पाहण्यासाठी तो आणि त्याचे चाहते उत्सुक आहेत.

आज रात्री 9 वाजल्यापासून उत्तर रामायण ही मालिका सुरू होणार आहे. रात्री 9 वाजता नवा भाग दाखवला जाणार आहे तर दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजता त्याचे पुर्नप्रक्षेपण दाखवले जाणार आहे. रामानंद सागर निर्मित उत्तर रामायणाचे 44 एपिसोड असून 10मे पर्यंत त्याचे प्रक्षेपण सुरू राहणार आहे. नियमित एकच भाग प्रक्षेपित केला जाणार आहे.

कुश च्या भूमिकेतील स्वप्नील जोशी

भारतामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मे पर्यंत कोरोनाव्हायरस लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. या काळामध्ये मालिकांचंही शुटींग पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. दरम्यान याकाळात नागरिकांच्या मनोरंजनासाठी रामायणासोबतच महाभारत, शक्तिमान अशी एकेकाळी टेलिव्हिजनचा सुवर्णकाळ समजल्या जाणार्‍या मालिका पुन्हा प्रक्षेपित केल्या जात आहेत.