रामायण, महाभारत यानंतर आता 'शक्तिमान' शो पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला? मुकेश खन्ना यांच्या Viral Video मधून खुलासा
Shaktimaan (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) आहे. त्यामुळे घरात बसून वेळ कसा घालवायचा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान टीव्ही वरील जुने लोकप्रिय कार्यक्रम 'रामायण' (Ramayan) आणि 'महाभारत' (Mahabharat) यांच्या पुनःप्रेक्षपणाची मागणी चाहत्यांकडून केली जात होती. चाहत्यांच्या मागणीचा आदर राखत महाभारत आणि रामायण हे दोन कार्यक्रम टीव्ही वर पुन्हा प्रसारित केले जात आहेत. त्यानंतर आता टीव्ही वरील लहान मुलांचा आवडता कार्यक्रम शक्तिमान पुन्हा सुरु होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. खरंतर 'शक्तिमान' (Shaktimaan) हा शो पुन्हा प्रसारित करावा अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.

याचदरम्यान शक्तिमानची भूमिका साकारलेले अभिनेते मुकेश खन्ना यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी शक्तिमान लवकरच टीव्हीवर परतेल असे आश्वासन दिले आहे. मुकेश खन्ना यांच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे चाहते अत्यंत खूश झाले आहेत. तसंच हा शो कधी सुरु होणार याची प्रतिक्षा करत आहेत.

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

#shaktimaan again Abhi maza aega na bidu 🔥🔥

A post shared by Fit Memer Official (@fit_memer) on

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चाहत्यांच्या मागणीची दखल घेत रामायण आणि महाभारत हे कार्यक्रम पुन्हा प्रसारीत करण्यास मान्यता दिली. त्यानुसार हे दोन्ही कार्यक्रम दूरदर्शनवर दाखवण्यात येत असून चाहत्यांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे.